SA vs IND | टीम इंडियाला मोठा धक्का, कॅप्टनला मैदानातच उलट्या, व्हिडीओ आला समोर

Team India Captain : साऊथ आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या मागे संकटे लागलेली दिसत आहेत. पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर दुसरीकडे कॅप्टनला उलट्यांचा त्रास झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

SA vs IND | टीम इंडियाला मोठा धक्का, कॅप्टनला मैदानातच उलट्या, व्हिडीओ आला समोर
Team India
| Updated on: Dec 12, 2023 | 3:40 PM

मुंबई : टीम इंडिया आता साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असून तिन्ही फॉरमॅटमधील मालिका होणार आहेत. यामधील टी-20 मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यावर आज दुसरा सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूला सराव सत्रादरम्यान उलट्या झाल्या आहेत.  सोशल मीडियावर याचा व्हिडीओ समोर आला आहे. कोण आहे तो स्टार खेळाडू जाणून घ्या.

कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडिया आणी साऊथ आफ्रिकेमध्ये आता टी-20 मालिका सूरू आहे. त्यानंतर 17 डिसेंबरला दोन्ही संघांमधील वन डे मालिका सुरू होणार आहे. वन डे मालिका सुरू होण्यासाठी काही दिवस असल्याने अजुनही काही भारतीय खेळाडू भारतामध्येच आहे. मायदेशात असलेल्या वन डे संघाचा कर्णधार के. एल. राहुल याच्याकडे वन डे मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सराव सत्रावेळी के. एल. राहुललाचा उलट्यांचा त्रास झाला.

पाहा व्हिडीओ-

 

नेमकं काय घडलं?

के. एल. राहुल याने आपल्या इन्स्टावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये, के. एल. राहुल रनिंग करताना दिसत आहे. त्यानंतर स्ट्रेचिंग करताना दिसत होता मात्र काही वेळातच तो बाजूला जाऊन उलटी करत होता. कॅप्टनला अशा उलट्या होत राहिल्या तर टीमसाठी वाईट बातमी आहे. कारण के. एल. ची तब्येत व्यवस्थि आहे ना असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.

व्हिडीओमध्ये राहुल आधीच सांगत असल्याचं दिसत आहे की,  बुमराह बोलणार की फलंदाजांची आयुष्य किती सुखी आहे. त्यानंतर राहुल गुपचूपपणे कॅमेरा तिथे नेतो आणि बुमराह तेच बोलते जे राहुलने सांगितलं होत.

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (c)/(wk), संजू सॅमसन (wk), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग, दीपक चहर