Mohammed Shami च्या फार्म हाऊस बाहेर तोबा गर्दी, नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Viral Video : टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी आता जगभर प्रसिद्ध झाला आहे. शमी गेल्या काही दिवसांसून चर्चेत असून येत्या दक्षिण आप्रिका दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे. त्याआधी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये शमीच्या फार्म हाऊसबाहेर शेकडोंच्या संख्येने गर्दी जमली आहे.

मुंबई : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याने वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामिरी करत सर्वांनाच धक्का दिला होता. आधी त्याला खाली बसवण्यात आलं होतं, मात्र जेव्हा प्लेइंग 11 मध्ये जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने धुमधडाका केलेलाा पाहायला मिळाला होता. मोहम्मद शमीला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं होतं. फायनलमध्ये पोहोचताना शमीच्या घातक बॉलिंगचा संघाला मोठा फायदा झाला. वर्ल्ड कपमधील दमदार प्रदर्शनानंतर शमीचे जगभर चाहते झाले. अशातच शमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
मोहम्मद शमी याच्या फार्म हाऊस बाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. मोहम्मद शमी फार्म हाऊसवर असल्याची माहिती समजताचा चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शमीसोबत फोटो काढण्यासाठी जमलेली गर्दी पाहून त्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात करण्यात आली. मोहम्मद शमीने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
टीम इंडियासाठी बाईक चालवणं सोडून दिलं
मला प्रवास, मासेमारी, ड्रायव्हिंग, बाईक आणि कार चालवायला खूप आवडतं. पण टीम इंडियासाठी खेळल्यावर मी बाईक चालवणं बंद केलं. कारण जर बाईक चालवताना जखमी झालो तर पण जेव्हा मी माझ्या आईला भेटायला जाताना राष्ट्रीय महामार्गावर कधीतरी बाईक किंवा कार चालवत असल्याचं शमी म्हणाला.
दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये शमी याने फक्त सात सामन्यांमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियाचा तो सर्वाधिक यशस्वी गोलंदाज राहिला. वर्ल्ड कपमध्ये शमीने तीनपेक्षा जास्तवेळा पाचपेक्षा जास्त विकेट घेतल्या. वानखेडेवर न्यूझीलंडविरूद्ध त्याने 57-7 विकेट घेतल्या. वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
