
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली. पहिल्या संघात दुबळ्या युएई संघाला डोकंच वर काढू दिलं नाही. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर युएईचा संघ पत्त्यासारखा कोसळला. भारताने पहिला सामना 9 विकेट राखून जिंकला. युएईने विजयासाठी दिलेलं आव्हान भारताने फक्त 27 चेंडूत पूर्ण केलं हा देखील एक विक्रम आहे. यात महत्त्वाचा वाटा राहीला तो फिरकीपटू कुलदीप यादवचा.. इंग्लंडविरुद्धची मालिका त्याने बेंचवर बसून पाहिली. मात्र आशिया कप स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये संधी मिळताच त्याचं सोनं केलं. पहिल्याच सामन्यात कुलदीप यादवने फक्त 7 धावा देत 4 गडी बाद केले आणि नंबवर गोलंदाज म्हणून आशिया कप स्पर्धेत प्रवास सुरु केला आहे. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात देखील आलं. पण कधी काळी त्याच्या मनात आयुष्य संपवण्याचा विचार आला होता. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण याबाबत त्यानेच खुलासा केला होता.
कुलदीप यादवने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा 13 वर्षांचा होतो तेव्हा मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. तेव्हा युपीच्या अंडर 15 संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण तेव्हा कामगिरी चांगली राहिली नाही. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकला होतो. तेव्हा मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. दरम्यान, कुलदीप यादवे नैराश्यावर मात केली आणि मेहनत केली. त्या मेहनतीचं फळ आज त्याला मिळत आहे. कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे.
कुलदीप यादवने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवड केली गेली. पण पाचही सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. असं असूनही कुलदीप यादव प्रयत्न करत राहिला. अखेर त्याच्या नावाचा पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धेत विचार झाला. त्याने प्लेइंग 11 मध्ये संधी गोलंदाजीची धार दाखवली. आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. आता कुलदीप यादवकडून पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातही अशाच अपेक्षा आहेत. भारत पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला होणार आहे.