Garry Sobers: महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाल आहे. क्रिकेट विश्वात त्यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती होती. वेस्ट क्रिकेटला एका उंचीवर नेण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं.

Garry Sobers: महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Garry Sobers: महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 17, 2026 | 10:00 PM

माजी क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार गॅरी सोबर्स यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गॅरी सोबर्स यांचं निधन वृ्द्धापकाळ आणि त्या वयातील संबंधित आजारांमुळे झाला. गॅरी सोबर्स यांना 28 जुलैला 90 वर्षे पूर्ण होणार होती. पण 11 दिवसाआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने क्रीडा इतिहासातील एका अत्यंत देदीप्यमान कारकिर्दीचा अंत झाला.या महान क्रिकेटपटूच्या निधनाची बातमी त्यांचे पुत्र डॅनियल यांनी दिली.  गॅरी सोबर्स यांनी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं आहे. गॅरी सोबर्स यांची गणना महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्यांनी दीर्घ काळ वेस्ट इंडिज संघाची धुरा सांभाळली आहे. आयसीसीने आपले वार्षिक पुरस्कार सुरू केले, तेव्हा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ या सर्वोच्च पुरस्काराला सोबर्स यांचे नाव दिले. आता हा पुरस्कार ‘सर गार्फिल्ड सोबर्स क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड’ म्हणून ओळखला जातो.

28 जुलै, 1936 रोजी बारबाडोसमध्ये जन्मलेल्या सोबर्स यांनी क्रिकेटला नवी ओळख दिली. सोबर्स डावखुरे फलंदाज होते. तसेच वेगवान मध्यमगती गोलंदाजी करायचे. इतकंच काय तर फिरकी टाकण्यातही तितकेच प्रभावी होते.  त्यांच्या पिढीतील विलक्षण क्षेत्ररक्षकांपैकी एक होते. त्यांच्या या खेळीमुळे एक परिपूर्ण क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख होती. सोबर्स यांनी 1952 मध्ये प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर 1954 मध्ये कसोटीत पदार्पण केले. पुढील 20 वर्षे, सोबर्स यांनी आपल्या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीने कसोटी क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं.सर सोबर्स यांनी 1965 ते 1972 या काळात वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आणि या काळात 39 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले.

सर सोबर्स यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द

सर सोबर्स यांनी वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले. यात त्याने 57.78 च्या सरासरीने 8032 धावा केल्या. यात 26 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने क्षेत्ररक्षणात 109 झेल घेतले आहेत. गोलंदाजी त्याने 34च्या सरासरीने 235 विकेट घेतले. यात सहा वेळा पाच गडी बाद करण्याचा मान मिळवला आहे.

Follow Us