WTC 2023 Final : Shubman Gill ला ऑस्ट्रेलियाचे कुठले बॉलर अडचणीत आणतील? चॅपल यांनी सांगितली त्यांची नाव

ICC WTC 2023 Final : फक्त दोन ठिकाणी शुभमन गिलला फसवता येऊ शकतं. ऑस्ट्रेलियचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांना शुभमन गिलच्या खेळात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या गिलला काळजी घ्यावी लागेल.

WTC 2023 Final : Shubman Gill ला ऑस्ट्रेलियाचे कुठले बॉलर अडचणीत आणतील? चॅपल यांनी सांगितली त्यांची नाव
Shubman Gil
Image Credit source: ANI
| Updated on: Jun 04, 2023 | 9:30 AM

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल तीन दिवसांवर आली आहे. येत्या 7 जूनपासून द ओव्हल ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनलचा सामना रंगणार आहे. टीम इंडियाने ICC WTC 2023 Final साठी जोरदार कंबर कसली आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांना सर्वाधिक अपेक्षा ओपनर शुभमन गिलकडून आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल सीजनमध्ये शुभमन गिलने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 800 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याशिवाय मागच्या 6-7 महिन्यात त्याने क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केलय.

आपल्या परफॉर्मन्सच्या बळावर शुभमन गिलने आज टीम इंडियात आपलं स्थान पक्क केलय. WTC फायनलमध्ये तो कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंगला येणार आहे.

त्यांना शुभमनच्या खेळात दिसल्या त्रुटी

फायनलआधी महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांना, शुभमन गिलच्या खेळात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. अतिरिक्त बाऊन्स आणि पेसमुळे शुभमन गिल अडचणीय येऊ शकतो असं चॅपल यांच मत आहे. द ओव्हलच्या विकेटवर शुभमन गिलसमोर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांना योग्य टप्प्यावर चेंडू टाकावा लागेल, असं चॅपल यांनी म्हटलं आहे.

तर, ऑस्ट्रेलियाला भोगावी लागेल शिक्षा

“मला जास्त खोलात शिराच नाही. पण मला खात्री आहे, मी जे पाहिलं, ती गोष्ट ऑस्ट्रेलियन्सच्या सुद्धा लक्षात आली असेल. डावाच्या सुरुवातीला शुभमन काही गोष्टी करतो, त्यामुळे तो अडचणीत येऊ शकतो. चेंडूला जास्त बाऊन्स दिला, तर तो विकेटपाठी कॅचआऊट होऊ शकतो. तो एक खूप चांगला प्लेयर आहे. ऑस्ट्रेलियन्सनी त्याला योग्य गोलंदाजी केली नाही, तर त्यांना शिक्षा भोगावी लागेल” असं ग्रेग चॅपल बॅकस्टेज विथ बोरीया कार्यक्रमात म्हणाले.

कुठले दोन ऑस्ट्रेलियन्स शुभमनला अडचणीत आणतील?

ग्रेग चॅपल टीम इंडियाचे माजी हेड कोच आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आपल्या अतिरिक्त वेगाने आणि जोश हेझलवूड आपल्या अतिरिक्त बाऊन्सने शुभमन गिलला अडचणीत आणू शकतात, असं ग्रेग चॅपल म्हणाले.

त्यावेळी चांगले खेळाडू सुद्धा आऊट होतात

“गिल याआधी सुद्धा इंग्लंडमध्ये आला होता. ऑस्ट्रेलियन्सनी चांगली बॉलिंग केली, तर त्याला सुद्धा इतरांसारखा संघर्ष करावा लागू शकतो. आपल्या अतिरिक्त वेगाने मिचेल स्टार्क त्याला अडचणी आणू शकतो. अतिरिक्त पेस खेळताना चांगले खेळाडू सुद्धा आऊट होतात. अतिरिक्त बाऊन्सही चांगल्या फलंदाजांना अडचणीत आणतो. मला वाटतं, जोश हेझलवूड आपल्या बाऊन्सने शुभमन गिलला त्रास देईल. हेझलवूड खेळणार नसेल, तर बोलँड खेळेल. तो सुद्धा कोणालाही अडचणी आणू शकतो. तो चांगली दिशा आणि टप्प्यावर बॉलिंग करतो” असं ग्रेग चॅपल म्हणाले.