Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक कारनामा, 8 धावांसह मोठा रेकॉर्ड ब्रेक

Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशी याने वयाच्या 15 वर्ष 26 व्या दिवशी आयपीएल स्पर्धेत इतिहास घडवला आहे. वैभव आयपीएल स्पर्धेत 500 धावा करणारा सर्वात वेगवान आणि युवा फलंदाज ठरला आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक कारनामा, 8 धावांसह मोठा रेकॉर्ड ब्रेक
Vaibhav Sooryavanshi Rajasthan Royals
Image Credit source: Rajasthanroyals.Com
| Updated on: Apr 22, 2026 | 10:13 PM

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि स्टार ओपनर बॅट्समन वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आपला धमाका कायम ठेवत आणखी एक कारनामा केला आहे. वैभव 22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरला. वैभवने लखनौ विरुद्ध 8 धावा केल्या. वैभवने या 8 धावा 11 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केल्या. मात्र त्यानंतरही वैभवने मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. वैभवने या सामन्यात चौकारासह धावांचं खातं उघडलं. वैभवने यासह आयपीएल स्पर्धेत 500 धावांचा टप्पा गाठला. वैभवने वयाच्या 15 व्या वर्षी हा विक्रम आपल्या नावावर केला. वैभवने यासह अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं.

वैभवकडून ग्लेन मॅक्सवेलचा रेकॉर्ड उद्धवस्त

वैभवने आयपीएल स्पर्धेत वेगवान 500 धावा पूर्ण करण्याबाबत भारताचा जावई आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याचा विक्रम मोडीत काढला. वैभवने मॅक्सवेलच्या तुलनेत 33 बॉलआधी कारकीर्दीत पहिल्या 500 धावा पूर्ण केल्या. मॅक्सवेलने 260 चेंडूत 500 धावांपर्यंत मजल मारली होती. तर वैभवने 227 बॉलमध्ये 500 रन्स पूर्ण केल्या.

आयपीएल आणि 500 धावा

वेगवान 500 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत युवा अनकॅप्ड फलंदाज प्रियांश आर्या तिसऱ्या स्थानी आहे. प्रियांशने 278 चेंडूत 500 धावा केल्यात. माजी फलंदाज वीरेंद्र सेहवान याने 500 धावांपर्यंत पोहचण्यासाठी 280 चेंडूंचा सामना केला होता. तर नमन धीर याने सेहवागच्या तुलनेत 3 चेंडू जास्त खेळून 500 धावा केल्यात.

वैभवकडून निराशा

यशस्वी आणि वैभव या सलामी जोडीने राजस्थानला अप्रतिम सुरुवात मिळवून दिलीय. त्यामुळे लखनौ विरुद्धही या दोघांकडून जबरदस्त अशा सुरुवातीची आशा होती. मात्र यशस्वीने निराशा केली. मोहम्मद शमी याने यशस्वी जैस्वाल आणि त्यानंतर ध्रुव जुरेल या दोघांना सलग 2 बॉलवर आऊट केलं.

त्यामुळे राजस्थानचा 3 ओव्हरनंतर 2 आऊट 32 असा स्कोअर झाला. त्यामुळे राजस्थान चाहत्यांना वैभवकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र वैभवही अपयशी ठरला. मोहसिन खान याने त्याच्या कोट्यातील पहिल्या आणि राजस्थानच्या डावातील चौथ्या ओव्हरमधील पहिले 5 चेंडू डॉट टाकले. मोहसिनने सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर वैभवला दिग्वेश राठी याच्या हाती कॅच आऊट केलं. मोहसिनने अशाप्रकारे विकेट मेडन टाकली. विशेष म्हणजे मोहसिनने वैभवसमोर विकेट मेडन ओव्हर टाकली. त्यासाठी मोहसिनच्या या कामगिरीची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

Follow Us