
आयपीएल 2026 स्पर्धेत जेतेपद कोण मिळवणार हे आता सांगणं कठीण आहे. पण संघाची बांधणी आणि खेळाडूंचा फॉर्म पाहून अंदाज व्यक्त केला जात आहे. मागच्या पर्वात केलेला चुका सुधारत पुन्हा एकदा संघ मैदानात उतरणार आहेत. मागच्या पर्वात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. पण यावेळी नव्या ताकदीसह संघ तयारी करत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघ मागच्या वेळी सातव्या क्रमांकावर राहिला होता. लखनौ सुपर जायंट्सने 14 पैकी फक्त 6 सामने जिंकले होते. तसेच 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. 27 कोटी रुपये मोजून फ्रेंचायझीने ऋषभ पंतला संघात घेतलं. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण खेळाडू आणि कर्णधार म्हणून निष्फळ ठरला. सुमार कामगिरी करूनही लखनौ सुपर जायंट्सने या पर्वात त्याच्यावर विश्वास टाकला आहे. त्याच्या नेतृत्वात पुन्हा एकदा संघाची बांधणी केली आहे. त्यामुळे यंदा कशी कामगिरी करणार याकडे लक्ष आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आर अश्विनने सुमार शेरा दिला आहे.
आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, या स्पर्धेतील टॉप 3 संघ तर आधीच ठरले आहेत. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी तीव्र लढत असेल. पण लखनौ सुपर जायंट्सचा यात नसेल. लखनौ सुपर जायंट्स संघ टॉप 6 मध्ये जागा मिळवणार नाही. त्यामुळे यंदाच्या पर्वातही लखनौ सुपर जायंट्सच्या पदरात निराशा पडेल असं भाकीत त्याने वर्तवलं आहे. एकीकडे, फ्रेंचायझी जेतेपदाचं स्वप्न पाहात असताना दुसरीकडे, आर अश्विनने सुमार शेरा दिला आहे. त्यामुळे आता लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी कशी राहते याकडे लक्ष असणार आहे. मागच्या दोन पर्वात तर लखनौने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. तसेच 2022 पासून संघाने एकदाही अंतिम फेरी गाठलेली नाही.
🚨LSG IS NOT QUALIFY FOR PLAYOFFS – ASHWIN.🚨
Ravi Ashwin said🎙️- Lucknow Super Giants will not qualify for the playoffs in IPL 2026 and are likely to finish in the bottom four.🤯
He also excluded Aiden Markram from the playing XI.
— Sam (@Cricsam01) March 22, 2026
लखनौ सुपर जायंट्स संघ : ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), एडन मार्करम, मिचेल मार्श, मोहम्मद शमी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एनरिक नॉर्खिया, वानिंदु हसरंगा, आयुष बडोनी, अब्दुल समद, आर्यन जुयाल, हिम्मत सिंह, मॅथ्यू ब्रीट्जके, शहबाज अहमद, नमन तिवारी, अर्शिन कुलकर्णी, अर्जुन तेंडुलकर, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, एम. सिद्धार्थ, प्रिंस यादव, आकाश सिंह आणइ जोश इंग्लिस