एमपीसीए अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच महानआर्यमन सिंधियांनी सांगितला फ्यूचर प्लान, म्हणाले..

Mahanaryaman Scindia Future Plan : महाआर्यमन सिंधिया यांची मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महाआर्यमन यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर काय म्हटलं? जाणून घ्या.

एमपीसीए अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच महानआर्यमन सिंधियांनी सांगितला फ्यूचर प्लान, म्हणाले..
Mpca President Mahanaryaman Scindia
Image Credit source: TV9
| Updated on: Sep 02, 2025 | 7:07 PM

सिंधिया कुटुंबातील तिसऱ्या पिढीला एमपीसीए अर्थात मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. माधव सिंधिया यांचे नातू आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महानआर्यमन सिंधिया यांनी आज 2 सप्टेंबर रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये एमपीसीएच्या अध्यक्षदापची जबाबदारी स्वीकारली. महानआर्यमन यांनी एमपीसीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त केलं. महानआर्यमन यांनी या दरम्यान एमपीसीएच्या इतिहासाबाबत भाष्य केलं. तसेच महानआर्यमन यांनी दिग्गज खेळाडू सीके नायडू आणि सय्यद मुश्ताक यांना अभिवादन केलं. तसेच महानआर्यमन यांनी त्यांचे आजोबा माधवराव सिंधिया यांच्या स्मृतीला उजाळा देत आठवणी सांगितल्या.

महानआर्यमन यांच्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. एमपीसीएच्या विकासासह खेळाडूंना सरावासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. महानआर्यमन यांनी मनोगत व्यक्त करताना आपला फ्यूचर प्लान सांगितला. ते भविष्यात काय काय करणार? त्यांचं प्राधान्य कशाला असणार? याबाबत एमपीसीएचे अध्यक्ष काय म्हणाले? हे जाणून घेऊयात.

महानआर्यमन काय म्हणाले?

“प्रत्येक स्तरावर खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं. सोबतच महिला खेळ आणि महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणं याला प्रथम प्राधान्य देणार”, असं महानआर्यमन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं.

“तसेच मध्य प्रदेशातील खेळाडूंचा अनेक स्पर्धेत दबदबा कायम रहावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणार”, असंही महानआर्यमन यांनी स्पष्ट केलं. तसेच यावेळेस महानआर्यमन यांनी एमपीसीएच्या आजी माजी सदस्यांचे आभार मानले. तसेच महानआर्यमन यांनी एमपीसीएच्या माजी अध्यक्षांचं त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आभार मानले. महानआर्यमन यांनी अभिलाष खांडेकर यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली.

महानआर्यमन यांना क्रिकेट प्रशासनाचा बराचसा अनुभव आहे. महानआर्यमन यांची 2022 साली जीडीसीए अर्थात ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे महानआर्यमन यांची त्याच वर्षी एमपीसीएचा आजीव सदस्य करण्यात आलं होतं. महानआर्यमन एमपीएल अर्धात मध्यप्रदेश टी 20 लीगचे सर्वेसर्वा आहेत.

दरम्यान भारतात 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहेत. या स्पर्धेतील एकूण 31 पैकी काही सामने इंदूरमधील ऐतिहासिक होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे एमपीसीए अध्यक्ष म्हणून महानआर्यमन यांच्यासाठी ही मोठी जबाबदारी असणार आहे.