मुंबईला 3 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या जयवर्धनेकडे श्रीलंकेला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्याची जबाबदारी

| Updated on: Dec 13, 2021 | 8:01 PM

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज महेला जयवर्धनेवर 2022 च्या टी20 विश्वचषकापूर्वी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महेला जयवर्धने याची श्रीलंका क्रिकेट संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

1 / 5
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज महेला जयवर्धनेवर 2022 च्या टी20 विश्वचषकापूर्वी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महेला जयवर्धने याची श्रीलंका क्रिकेट संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने महेला जयवर्धनेसोबत एक वर्षांचा करार केला आहे.

2 / 5
T20 विश्वचषक 2022 मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला आपल्या खेळण्याच्या शैलीत बदल करणे आवश्यक आहे, म्हणूनच बोर्डाने अनुभवी आणि यशस्वी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

3 / 5
महेला जयवर्धने 1 जानेवारी 2022 पासून पदभार स्वीकारेल. यासोबतच तो श्रीलंकेच्या अंडर-19 संघासोबतही काम करत राहणार आहे. तो 19 वर्षांखालील संघाचा सल्लागार प्रशिक्षक आहे.

4 / 5
महेला जयवर्धने इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. 2017 मध्ये प्रशिक्षक बनताच जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आणि त्यानंतर 2019, 2020 मध्येदेखील मुंबईने आयपीएल स्पर्धा जिंकली. महेला जयवर्धने आयपीएलसोबत बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायटन्स आणि द हंड्रेडमध्ये साउथहॅम्प्टन संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

5 / 5
जयवर्धनेकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. या दिग्गज क्रिकेटपटूने 149 कसोटीत 34 शतकांच्या मदतीने 11,814 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, जयवर्धनेने 448 वनडेमध्ये 19 शतकांच्या मदतीने 12,650 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 55 टी-20 सामन्यांमध्ये 14,93 धावा केल्या आहेत.