
15 ऑगस्ट 2020 सारखी 5 एप्रिल 2025 ही तारीख भारतीय क्रीडाप्रेमींच्या स्मरणात कायमस्वरूपी राहिल, अशी चर्चा क्रीडाविश्वात रंगली आहे. कारण 15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांना महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर धोनी फक्त आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसत आहे. असं असताना 5 एप्रिल 2025 रोजी धोनी निवृत्ती घेईल? अशी चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. आतापर्यंत धोनीच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच धोनीचे आई वडील सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी मागच्या पाच वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. प्रत्येक आयपीएलवेळी रिटायर होणार या चर्चा रंगतात. पण धोनी पुन्हा मैदानात उतरताना दिसतो. आयपीएल 2023 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं होतं. तेव्हा धोनी रिटायर होईल या चर्चांना उधाण आलं होतं. पण तसं काही झालं नाही. धोनी त्यानंतर अजून जोमाने खेळताना दिसला. पण या दरम्यान धोनीचे आई वडील एकदाही सामना पाहण्यासाठी आले नव्हते.
आयपीएल 2025 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात अचानक धोनीचे आई वडील सामना पाहण्यासाठी आले. या बातमीने चाहत्यांना मनात शंकांचं काहूर माजलं आहे. धोनी रिटायर तर होणार नाही ना? दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेपॉक मेदानात सामना सुरु आहे. या सामन्यापूर्वी जियो हॉटस्टारचा अँकरने हा खुलासा केला. धोनी आई वडील सामना पाहण्यासाठी आल्याचं सांगितलं. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. काही वेळानंतर त्यांना टीव्ही स्क्रिनवर धोनीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली. मनात शंका आहे की, धोनी शेवटचा सामना तर खेळत नाही ना?
Home sweet Anbuden ft. The Dhonis! 🏠🏟️#CSKvDC #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/Bj1rnt1nCw
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 5, 2025
धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आक्रमक फलंदाजीने सर्वांच्या गळ्यातलं ताईत बनला. 2007 मध्ये कर्णधारपद हाती घेतल्यानंतर टी20 वर्ल्डकप जिंकून दिला. त्यानंतर धोनीने मागे वळून पाहिलं नाही. पण इतकी सारी यशाची शिखरं गाठत असताना धोनीला मैदानात पाहण्यासाठी कधीच त्याचा आई वडील आले नाहीत. पण आता मैदानात सामना पाहण्यासाठी आल्याने चाहत्यांचं शंकेने मन खात आहे.