AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : 6,6,6,6,6,4, आठव्या नंबरवर येऊन गोलंदाजी फोडली, नंतर बॉलिंगमध्ये कमाल, असा हवा ऑलराऊंडर

जरा विचार करा, 8 व्या नंबरचा खेळाडू आणि 450 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग. हे वाचून तुम्ही थोडे हैराण व्हाल, पण हे खरं आहे. फक्त बॅटिंगमध्येच नाही, या प्लेयरने बॉलिंगमध्ये सुद्धा कमाल केली. 12 जुलैला हा सामना झाला.

VIDEO : 6,6,6,6,6,4, आठव्या नंबरवर येऊन गोलंदाजी फोडली, नंतर बॉलिंगमध्ये कमाल, असा हवा ऑलराऊंडर
matthew waite hit 34 runs in one over
| Updated on: Jul 13, 2024 | 1:43 PM
Share

याला म्हणतात खरा ऑलराऊंडर, ज्याने एक ओव्हरमध्ये 34 धावा चोपल्या. त्यानंतर गोलंदाजीला आला, तेव्हा प्रतिस्पर्धी टीमसाठी काळ बनला. T20 मॅचमध्ये तुफानी गोलंदाजी केली. एकट्याच्या बळावर त्याने विजयाची स्क्रिप्ट लिहिली. आम्ही बोलतोय मॅथ्यू वेट बद्दल. हा इंग्लंडचा प्लेयर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून त्याने पाऊल ठेवलेलं नाही. त्याने T20 Blast मध्ये आपली क्षमता दाखवून दिलीय. वुर्सेस्टरशर आणि बर्मिंघम बीयर्समध्ये सामना होता. 12 जुलैला हा सामना झाला. मॅथ्यू वेट वुर्सेस्टरशर टीममधून खेळत होता. या टीमने मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. पावसामुळे 17-17 ओव्हरची मॅच झाली. यात वुर्सेस्टरशर खराब सुरुवात केली.

8 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅथ्यू वेटने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने 450 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली. फक्त 8 चेंडूत नाबाद 36 धावा ठोकल्या. या तुफानी बॅटिंगमध्ये मॅथ्यूने 34 धावा एकाच ओव्हरमध्ये कुटल्या. वुर्सेस्टरशरच्या इनिंगमधील ही शेवटची ओव्हर होती. मॅथ्यू वेटने 5 सिक्स आणि 1 फोर मारुन 34 धावा लुटल्या. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने फक्त चौकार मारला. त्या व्यतिरिक्त 5 बॉलमध्ये 5 सिक्स मारले.

गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याने कमाल केली

हे झालं बॅटिंगबद्दल. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याने कमाल केली. मॅथ्यू वेटच्या गोलंदाजीमुळे वुर्सेस्टरशरने 55 रन्सनी सामना जिंकला. बर्मिंघम बीयर्सची पूर्ण टीम 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 132 रन्सवर ऑलआऊट झाली. ते पूर्ण 17 ओव्हर्स सुद्धा खेळू शकले नाहीत. फक्त 15.2 ओव्हर्समध्ये त्यांचा खेळ संपला. यात मोठा रोल 3.2 ओव्हर टाकणाऱ्या मॅथ्यू वेटचा होता. मॅथ्यू वेटने 3.2 ओव्हरमध्ये 29 रन्स देऊन 4 विकेट काढल्या. 9 चेंडू त्याने डॉट टाकले.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.