MI vs GG, WPL 2023 | मुंबईची गुजरातवर 55 धावांनी मात, पलटणची विजयी घोडदौड सुरुच

| Updated on: Mar 15, 2023 | 12:03 AM

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या पलटणने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुजरात जायंट्सला पराभूत करत मुंबईने सलग पाचवा विजय मिळवला आहे.

MI vs GG, WPL 2023 | मुंबईची गुजरातवर 55 धावांनी मात, पलटणची विजयी घोडदौड सुरुच
Follow us on

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. मुंबईने गुजरातवर 55 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र गुजरातला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 107 धावाच करता आल्या. यासह मुंबईचा या मोसमातील सलग पाचवा विजय ठरला आहे.

गुजरातची बॅटिंग

गुजरातकडून हर्लीन देओल हीने सर्वाधिक 22 धावा केल्या. तर कॅप्टन स्नेह राणा 20, सुषमा वर्मा 18 आणि सब्भिनेनी मेघना हीने 16 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त तिघांना भोपळा फोडता आला नाही. तर उर्वरितांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मुंबईकडून नॅट सायव्हर-ब्रंट आणि हॅली मॅथ्यूज या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर अमेलिया केर हीने 2 आणि इस्सी वोंगने 1 विकेट घेतला.

हे सुद्धा वाचा

मुंबईचा सलग पाचवा विजय

मुंबईची बॅटिंग

त्याआधी गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने 8 विकेट्सने गमावून 20 ओव्हरमध्ये 162 धावा केल्या.
मुंबईकडून कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. कौरने या खेळीत 30 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले. तसेच सलामीवीर यास्तिका भाटीयाने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्स लगावला.

नॅट सायव्हर-ब्रंट हीने 31 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 36 धावांचं योगदान दिलं. अमेलिया केर 19 रन्स करुन आऊट झाली. या व्यतिरिक्त मुंबईच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. गुजरातकडून अॅशलेग गार्डनर हीने 4 ओव्हरमध्ये 34 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तर किम गर्थ आणि तनुजा कंवर या दोघींनी 1-1 विकेट घेतली.

मुंबईचा गुजरातवर दुसरा विजय

दरम्यान मुंबईचा हा या मोसमातील गुजरात विरुद्धचा दुसरा विजय ठरला आहे. दोन्ही संघ याआधी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 4 मार्च रोजी भिडले होते. या सामन्यात मुंबईने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला होता. हा सामना जिंकून मुंबईने मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता.

गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन | स्नेह राणा (कॅप्टन), सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, दयालन हेमलता, अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (wk), किम गर्थ, तनुजा कंवर आणि मानसी जोशी.

मुंबई इंडियन्स | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, धारा गुज्जर, अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता आणि सायका इशाक.