AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2023, MI vs GG | मुंबईकडून गुजरातला विजयासाठी 163 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील या मोसमातील दुसरा सामना आहे. मुंबईने या सामन्यात गुजरातचा 143 धावांनी पराभव केला होता.

WPL 2023, MI vs GG | मुंबईकडून गुजरातला विजयासाठी 163 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
| Updated on: Mar 15, 2023 | 12:07 AM
Share

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 12 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईने गुजरातला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 8 विकेट्सने गमावून 20 ओव्हरमध्ये 162 धावा केल्या. मुंबईकडून कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. कौरने या खेळीत 30 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले.

तसेच सलामीवीर यास्तिका भाटीयाने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. नॅट सायव्हर-ब्रंट हीने 31 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 36 धावांचं योगदान दिलं. अमेलिया केर 19 रन्स करुन आऊट झाली. या व्यतिरिक्त मुंबईच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

गुजरातला विजयासाठी 163 धावांचं आव्हान

गुजरातकडून अॅशलेग गार्डनर हीने 4 ओव्हरमध्ये 34 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तर किम गर्थ आणि तनुजा कंवर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

या मोसमातील मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील हा दुसरा सामना आहे. दोन्ही संघ याआधी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 4 मार्च रोजी भिडले होते. या सामन्यात मुंबईने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला होता. हा सामना जिंकून मुंबईने मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता.

मुंबईची घोडदौड सुरुच

दरम्यान मुंबई इंडियन्सची या मोसमातील घोडदौड सुरुच आहे. मुंबईने या मोसमात 4 सामने खेळले आहेत. या 4 ही सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता गुजरात मुंबईला पराभूत करत पहिल्या पराभवाचा वचपा घेत विजयी घोडदौड ठप्प करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन | स्नेह राणा (कॅप्टन), सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, दयालन हेमलता, अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (wk), किम गर्थ, तनुजा कंवर आणि मानसी जोशी.

मुंबई इंडियन्स | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, धारा गुज्जर, अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता आणि सायका इशाक.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.