MI vs KKR : मुंबईचा आयपीएलमध्ये महारेकॉर्ड, केकेआरला पराभूत करत पलटणने घडवला इतिहास

Mumbai Indians Ipl 2025 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात पहिली यशस्वी टीम असणाऱ्या मुंबई इंडियन्सने 18 व्या मोसमात इतिहास घडवला आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत महारेकॉर्ड केला आहे.

MI vs KKR : मुंबईचा आयपीएलमध्ये महारेकॉर्ड, केकेआरला पराभूत करत पलटणने घडवला इतिहास
Mumbai Indians Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 01, 2025 | 5:33 PM

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने कोलकातावर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने या विजयासह महारेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेत कोणत्याही एका मैदानात सर्वाधिक सामने जिंकणारी टीम ठरली आहे. मुंबईने याबाबत दोघांना मागे टाकलं आहे. मुंबईने सनरायजर्स हैदाराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्ससह अनेक संघांना मागे टाकलं आहे.

मुंबईने केकेआरला पराभूत करत वानखेडे स्टेडियममध्ये 53 वा विजय मिळवला. मुंबई यासह आयपीएल स्पर्धेत एका स्टेडियममध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी टीम ठरली. या यादीत गतविजेता कोलकाता दुसऱ्या स्थानी आहे. केकेआरने घरच्या मैदानात ईडन गॉर्डनमध्ये 52 सामने जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 51 सामने जिंकले आहेत. सीएसकेने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात या स्टेडियममध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत.

मुंबईचं कडक कमॅबक

मुंबई या 18 व्या मोसमात अपेक्षित सुरुवात करण्यात अपयशी ठरली. मुंबईला पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मुंबईला आधी चेन्नई सुपर किंग्सने 4 विकेट्सने पराभूत केलं. त्यानंतर गुजरात टायटन्सने पलटणचा धुव्वा उडवला. मात्र त्यानंतर मुंबईने घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडलं.

घरच्या मैदानात सर्वाधिक विजय

  • मुंबई इंडियन्स : 53 विजय, वानखेडे स्टेडियम
  • कोलकाता नाईट रायडर्स : 52 विजय, ईडन गार्डन्स स्टेडियम
  • चेन्नई सुपर किंग्स : 51 विजय, एमए चिदंबरम स्टेडियम
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : 44 विजय, एम चिन्नास्वामी स्टेडियम
  • राजस्थान रॉयल्स : 37 विजय, सवाई मानसिंह स्टेडियम
  • सनरायजर्स हैदराबाद : 37 विजय, राजीव गांधी स्टेडियम
  • दिल्ली कॅपिट्ल्स : 37 विजय, अरुण जेटली स्टेडियम
  • पंजाब किंग्स : 31 विजय, आयएस बिंद्रा स्टेडियम

मुंबईची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.