
मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. सूर्याने रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली या सारख्या दिग्गज फलंदाजांना माग टाकत कीर्तीमान केला आहे. सूर्या आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान 4 हजार धावा करणार पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच सूर्याने वेगवान 4 धावा करणारा एकूण तिसरा फलंदाज होण्याचा बहुमानही आपल्या नावावर केला आहे. सूर्याआधी मिस्टर 360 अर्थात एबी डीव्हीलियर्स आणि ख्रिस ग्रेल या दोघांनी अशी कामगिरी केली होती.
सूर्यकुमारला लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्याआधी हा महारेकॉर्ड करण्यासाठी अवघ्या 33 धावांची गरज होती. सूर्याने लखनौ विरुद्ध 14 व्या ओव्हरमध्ये आवेश खान याच्या बॉलिंगवर फोर लगावला. सूर्याने यासह 4000 हजार धावा पूर्ण केल्या. सूर्याने यासह सर्वात कमी चेंडू 4 हजार धावा पूर्ण करत ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरैश रैना याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
सूर्यकुमार यादव 4 हजार धावा करणारा 12 वा भारतीय ठरला आहे. सूर्यकुमार यादव याच्याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना यासारख्या फलंदाजांनी 4 हजार धावा केल्या. मात्र सूर्यकुमार प्रमाणे या वरील फलंदाजांना वेगवान 4 हजार धावा करता आल्या नाहीत.
सूर्याने लखनौ विरुद्ध आणखी एक कारनामा केला. सूर्याने आयपीएलमध्ये 150 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. सूर्या अशी कामगिरी करणारा 13 वा भारतीय फलंदाज ठरला. सूर्याने लखनौ विरुद्ध पहिलाच षटकार लगावता ही कामगिरी केली. सूर्याने लखनौ विरुद्ध 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 192.86 च्या स्ट्राईक रेटने 54 धावा केल्या.
एकच वादा सूर्या दादा
Suryakumar Yadav becomes the fastest Indian to reach 4000 runs in the IPL by balls faced
Fastest to 4000 IPL runs by balls faced
2,658 balls – AB de Villiers 🇿🇦
2,658 balls – Chris Gayle 🌴
2,714 balls – Suryakumar Yadav* 🇮🇳
2,809 balls – David Warner 🇦🇺
2,881 balls – Suresh… pic.twitter.com/pP280iqPVt— All Cricket Records (@Cric_records45) April 27, 2025
दरम्यान सूर्याने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. सूर्याने या हंगामात एकूण 10 सामन्यांमध्ये 252 बॉलमध्ये 169.44 च्या स्ट्राईक रेटने आणि 61 च्या सरासरीने एकूण 427 धावा केल्या आहेत. सूर्याने या हंगामात आतापर्यंत 3 अर्धशतकं झळकावली आहेत.