AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RR 2023 : Tim david ची बॅटिंग पाहून सचिन तेंडुलकरही स्वत:ला रोखू शकला नाही, मैदानावरचा VIDEO व्हायरल

MI vs RR IPL 2023 : मुंबई इंडियन्सने सुद्धा टिम डेविडचा एक खास व्हिडिओ पोस्ट केलाय. टीम डेविडने लास्ट ओव्हरमध्ये जास्त वाट पाहिली नाही. थेट मॅचच संपवून टाकली. मुंबई इंडियन्सला विजयासाठी लास्ट ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती.

MI vs RR 2023 : Tim david ची बॅटिंग पाहून सचिन तेंडुलकरही स्वत:ला रोखू शकला नाही, मैदानावरचा VIDEO व्हायरल
IPL 2023 Tim david Image Credit source: instagram
| Updated on: May 01, 2023 | 9:46 AM
Share

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरने अनेकदा अचाट कामगिरी करुन दाखवलीय. त्याच्या सन्मानार्थ अनेकांच्या माना त्याच्यासमोर झुकल्या. सचिन दुसऱ्यासाठी सुद्धा असं करताना फार कमीवेळा दिसतो. IPL च्या इतिहासातील 1000 व्या मॅचमध्ये असंच काहीस घडलं. मुंबई इंडियन्ससाठी टिम डेविडने कमालीच प्रदर्शन केलं. सचिन तेंडुलकरने स्वत: मैदानात जाऊन त्याला हात मिळवला व त्याची गळाभेट घेतली.

त्यात तो फोटो सुद्धा आहे

IPL च्या सोशल मीडिया हँडलवरुन मुंबई इंडियन्सच्या विजयाचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात सचिनने टिम डेविडची गळाभेट घेतल्याचा फोटो आहे. टिम डेविडने काल जी वादळी खेळी केली, त्याला तोड नाही. त्याने 14 चेंडूत नाबाद 45 धावा फटकावल्याय लास्ट ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 3 सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला.

3 चेंडूत पलटली बाजी

टिम डेविडने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 14 चेंडूंचा सामना केला. पण त्याने खरी बाजी पलटली 3 चेंडूत. लास्ट ओव्हरमधील हे तीन चेंडू होते. जेसन होल्डर बॉलिंग करत होता. नेट्समध्ये टिम डेविड जशी प्रॅक्टिस करतो, तसच त्याने तिन्ही चेंडू प्रेक्षक स्टँडमध्ये पाठवले.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

‘कॉपी अँड पेस्ट’

मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टिम डेविडच्या प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. राजस्थान विरुद्ध टिम डेविडने जसे सिक्स मारले, तसेच सिक्स तो प्रॅक्टिसमध्ये मारताना दिसतोय. म्हणूनच मुंबई इंडियन्सने व्हिडिओला ‘कॉपी अँड पेस्ट’ असं कॅप्शन दिलय.

डेविडने 6 चेंडूंची वाट पाहिली नाही

मॅचच्या लास्ट ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. जेसन होल्डर बॉलिंग करत होता. स्ट्राइकवर टिम डेविड होता. ओव्हर सुरु होण्याआधी सामना कुठल्या दिशेला जाणार, हे माहित नव्हतं. पण टिम डेविडला माहित होतं. त्याला लवकर सामना संपवायचा होता. म्हणून 17 धावा करण्यासाठी डेविडने 6 चेंडूची वाट पाहिली नाही. जेसन होल्डरच्या ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडूंवर टिम डेविडने 3 सिक्स मारुन मुंबई इंडियन्सचा विजय सुनिश्चित केला. सचिनने सुद्धा मैदानात उतरुन टिम डेविडच कौतुक केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.