MI vs SRH IPL 2022: मुंबईची गोलंदाजी ‘फूस’, Rahul Tripathi ची क्लासिक बॅटिंग Must Watch

| Updated on: May 17, 2022 | 9:47 PM

MI vs SRH IPL 2022: राहुल त्रिपाठीने आज सुद्धा चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं. त्याने 44 चेंडूत 76 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि तीन षटकार होते.

MI vs SRH IPL 2022: मुंबईची गोलंदाजी फूस, Rahul Tripathi ची क्लासिक बॅटिंग Must Watch
Rahul Tripathi
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: प्लेऑफमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आज मुंबई (SRH vs MI) विरुद्ध चांगली धावसंख्या उभारली. मुंबईच्या गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नाहीय, हे पुन्हा एकदा दिसून आलं. मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 97 धावात गारद करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आज साफ निराशा केली. सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) लवकर बाद झाला. पण राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि प्रियाम गर्गने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. गर्ग-त्रिपाठी जोडीने बुमराहसह सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. गर्गने मिळालेल्या संधीचं सोन केलं. त्याने 26 चेंडूत 42 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. रमणदीप सिंहने त्याला आपल्याच गोलंदाजीवर कॅचआऊट केलं.

एकदा इथे क्लिक करुन राहुल त्रिपाठीने कव्हर्स, मिडविकेटला मारलेले फटके, त्याची क्लासिक बॅटिंग पहा

हे सुद्धा वाचा

डेथ ओव्हर्समध्ये मुंबईची चांगली गोलंदाजी

राहुल त्रिपाठीने आज सुद्धा चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं. त्याने 44 चेंडूत 76 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि तीन षटकार होते. निकोलस पूरनसोबत मिळून त्याने तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची 76 धावांची भागीदारी केली. पूरनने 22 चेंडूत 38 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकार होते. राहुल त्रिपाठी, गर्ग आणि पूरनच्या फलंदाजीच्या बळावर SRH ने निर्धारित 20 षटकात सहाबाद 193 धावा केल्या. राहुल त्रिपाठी आणि पूरनची जोडी क्रीझवर असताना हैदराबाद सहज 200 धावांचा टप्पा ओलांडेल असं वाटत होतं. पण ही जोडी फुटली त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांची चांगली बॉलिंग केली. त्यामुळे हैदराबादला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.

हैदराबादला आजचा सामना जिंकण महत्त्वाचं का?

मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला. त्यामुळे प्रतिष्ठाराखण्यापुरतीच मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 12 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी हैदराबादने सलग पाच सामने गमावलेत. पॉइंटस टेबलमध्ये त्याने 10 पॉइंटस झाले आहेत. पहिले दोन सामने गमावल्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले व आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या. पण नंतर सलग पाच सामने गमावले. आज मुंबई इंडियन्सविरुद्ध 13 वा सामना खेळत आहेत. आजचा सामना हैदराबादसाठी ‘करो या मरो’ आहे. कारण आजचा सामना हरला, तर हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण आज जिंकले, तर प्लेऑफच्या शर्यतीत ते टिकून राहतील. पण म्हणून ते प्लेऑफमध्ये दाखल होतीलच, असं ठामपणे म्हणता येणार नाही. कारण आजचा आणि पुढचा सामना जिंकला, तरी त्यांना दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल.