MI vs SRH IPL 2022: 6,4,4, धोपटलं ते पण बुम बुम बुमराहला, हैदराबादच्या तरुणांनी MI ची गोलंदाजी फोडून काढली, VIDEO

MI vs SRH IPL 2022: मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात दोन बदल केले आहेत. संजय यादवने आज मुंबईकडून डेब्यू केला. त्याशिवाय मयंक मार्कंडेयला आज पुन्हा संधी दिली.

MI vs SRH IPL 2022: 6,4,4, धोपटलं ते पण बुम बुम बुमराहला, हैदराबादच्या तरुणांनी MI ची गोलंदाजी फोडून काढली, VIDEO
Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 8:31 PM

मुंबई: वानखेडे स्टेडियमर आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (MI vs SRH) सामना सुरु आहे. IPL 2022 स्पर्धेतला हा 65 वा सामना आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने आज टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला. त्यामुळे प्रतिष्ठाराखण्यापुरतीच मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 12 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी हैदराबादने सलग पाच सामने गमावलेत. पॉइंटस टेबलमध्ये (IPL Points Table) त्याने 10 पॉइंटस झाले आहेत. पहिले दोन सामने गमावल्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले व आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या. पण नंतर सलग पाच सामने गमावले. आज मुंबई इंडियन्सविरुद्ध 13 वा सामना खेळत आहेत. आजचा सामना हैदराबादसाठी ‘करो या मरो’ आहे. कारण आजचा सामना हरला, तर हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण आज जिंकले, तर प्लेऑफच्या शर्यतीत ते टिकून राहतील. पण म्हणून ते प्लेऑफमध्ये दाखल होतीलच, असं ठामपणे म्हणता येणार नाही. कारण आजचा आणि पुढचा सामना जिंकला, तरी त्यांना दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल.

बुमराहच्या गोलंदाजीवर हल्लाबोल

मुंबई इंडियन्सला आज पहिला विकेट लवकर मिळाला. संघाची धावसंख्या 18 असताना, अभिषेक शर्मा बाद झाला. डॅनियल सॅम्सने अभिषेकला 9 धावांवर मार्केडयेकरवी झेलबाद केलं. पण प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठीने फक्त डावच सावरला नाही, तर वेगाने धावा जमवल्या. पावरप्लेच्या सहा षटकात हैदराबादच्या एकबाद 57 धावा झाल्या आहेत. 9 ओव्हर्समध्ये हैदराबादच्या एक बाद 89 धावा झाल्या आहेत. राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग दोघे फटकेबाजी करतायत. जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच ओव्हरमध्ये राहुल त्रिपाठीने हल्लाबोल केला. बुमराहच्या पहिल्याच षटकात 15 धावा लुटल्या.

जसप्रीत बुमराहला कसं धोपटलं, ते इथे एकदा क्लिक करुन पहा

मुंबईच्या संघात दोन बदल

मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात दोन बदल केले आहेत. संजय यादवने आज मुंबईकडून डेब्यू केला. त्याशिवाय मयंक मार्कंडेयला आज पुन्हा संधी दिली.

गर्गने संधीचं सोनं केलं

सनरायजर्स हैदराबादनेही दोन बदल केले आहेत. प्रियम गर्ग आणि फजल फारुकीला संधी दिली. प्रियम गर्गने मिळालेल्या संधीचं सोन केलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.