AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH IPL 2022 Match Prediction: हैदराबादसमोर एकच पर्याय, मुंबईला हरवा, प्लेऑफची आशा जिवंत ठेवा

हैदराबादचे अजून दोन सामने बाकी आहेत. मुंबईसह अन्य संघारविरुद्ध होणारा आणखी एक सामना जिंकला, तर त्यांचे 14 पॉइंटस होऊ शकतात. त्यानंतर त्यांना दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल.

MI vs SRH IPL 2022 Match Prediction: हैदराबादसमोर एकच पर्याय, मुंबईला हरवा, प्लेऑफची आशा जिवंत ठेवा
MI vs SRH Image Credit source: IPL
| Updated on: May 16, 2022 | 8:12 PM
Share

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर उद्या मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (MI vs SRH) सामना होत आहे. मुंबईसाठी हा सामना फार महत्त्वाचा नाहीय. पण सनरायजर्स हैदराबादला उद्या जिंकावचं लागेल. कारण प्लेऑफच्या त्यांच्या आशा या सामन्याच्या निकालावर अवलंबून असतील. मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या (Play off) शर्यतीतून आधीच बाहेर झाला आहे. SRH चा कॅप्टन केन विलियमसनचा सलग पाच सामन्यांपासून सुरु असलेली ही पराभवाची मालिका खंडीत करण्याचा प्रयत्न असेल. सुरुवातीचे दोन सामने हरल्यानंतर हैदराबादची टीम सलग पाच सामने जिंकली होती. त्यानंतर सलग पाच सामने त्यांनी गमावले. मुंबई विरुद्ध होणारा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण हा विजय त्यांना प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवेल. तोच पराभव पुढची सगळी समीकरण बिघडवेल. मुंबई इंडियन्ससाठी प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

हैदराबादचे अजून दोन सामने बाकी आहेत. मुंबईसह अन्य संघारविरुद्ध होणारा आणखी एक सामना जिंकला, तर त्यांचे 14 पॉइंटस होऊ शकतात. त्यानंतर त्यांना दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. मुंबई विरुद्ध हरले, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. कारण शेवटचा सामना जिंकला तर त्यांचे 12 च पॉइंट होतील.

केन विलियमसनचा फॉर्म चिंतेचा विषय

हैदराबादला आपल्या फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. कॅप्टन केन विलियमसनचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. त्याने 12 सामन्यात 288 धावा केल्या आहेत. मधली फळी चांगली कामगिरी करतेय. राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम आणि निकोलस पूरन चांगलं प्रदर्शन करतायत.

गोलंदाजी हैदराबादची ताकत

हैदराबादची खरी ताकत त्यांची गोलंदाजी आहे. उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मार्को जॅनसेन, टी. नटराजन यांच्या आत येणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांना त्रस्त करुन सोडलं आहे.

मुंबईच्या संघात आत्मविश्वास

मुंबईने मागचा चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना जिंकला होता. त्यांनी 97 रन्समध्ये चेन्नईला ऑलआऊट केलं होतं. मुंबईच्या संघात सध्या आत्मविश्वास आहे. रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे. इशान किशनच्या कामगिरीत सातत्य नाहीय. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत या दोघांना आणखी जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता आहे.

मुंबईच्या गोलंदाजांचा रोल महत्त्वाचा

मुंबईच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास मागच्या काही सामन्यात जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली होती. डॅनियल सॅम्स, रायली मेरेडिथही चांगली गोलंदाजी करतायत. फक्त त्यांना कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल. कुमार कार्तिकेयवरही सगळ्यांच्या नजरा असतील.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.