Mumbai Indians IPL 2022: मुंबईच्या पराभवाची पाच कारणं, म्हणून चॅम्पियन संघाची अशी स्थिती झाली

यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने खूप खराब कामगिरी केली. पाचवेळचा विजेता हाच तो संघ का? असा प्रश्न मुंबईची कामगिरी पाहून पडला.

May 10, 2022 | 9:03 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 10, 2022 | 9:03 PM

यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने खूप खराब कामगिरी केली. पाचवेळचा विजेता हाच तो संघ का? असा प्रश्न मुंबईची कामगिरी पाहून पडला. मुंबईच्या पराभवाचं पहिलं कारण आहे गोलंदाजी. अन्य संघांच्या तुलनेत मुंबईकडे जसप्रीत बुमराह सोडल्यास दुसरा एकही प्रभावी गोलंदाज नव्हता.

1 / 5
रोहित शर्मा आणि इशानची जोडी हे मुंबईच्या पराभवाचं दुसरं कारण आहे. एखाद-दोन सामने सोडल्यास ही सलामीची जोडी सातत्याने अपयशी ठरली. दोघांनाही टीमला चांगली सुरुवात करुन देता आली नाही.

2 / 5
मुंबईच्या पराभवाचं तिसरं कारण आहे टिम डेविड सारख्या फलंदाजाला सहा सामने बाहेर बसवणं. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूला मुंबईने 8 कोटीपेक्षापण जास्त रक्कम मोजून विकत घेतलं होतं.

3 / 5
मुंबई इंडियन्सकडे कायरन पोलार्ड सारखा फिनिशर आहे. पण या सीजनमध्ये पोलार्डची बॅटच चालली नाही. तो फ्लॉप होता. अनेकदा संधी असूनही तो मुंबईला विजय पथावर नेऊ शकला नाही.

4 / 5
इशान किशन सारख्या एका खेळाडूवर मुंबईने 15 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. एवढ्या रक्कमेत ते अजून चांगले गोलंदाज-फलंदाज घेऊ शकले असते. पोलार्ड ऐवजी इशान किशनला रिटेन केलं असतं, तर मुंबईचाच फायदा होता.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें