
डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील सहाव्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स वूमन्स हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. गुजरात या मोसमात अजिंक्य आहे. गुजरातने एश्ले गार्डनर हीच्या नेतृत्वात दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरात मुंबई विरुद्ध सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर मुंबईची या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. मुंबईला या मोसमातील सलामीच्या सामन्यात आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र मुंबईने दुसऱ्या सामन्यात दिल्लीवर मात करत विजय मिळवला. आता मुंबईचा आपल्या तिसर्या सामन्यात विजयी ट्रॅकवर कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.त्याआधी 7 वाजता मुंबईने टॉस जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.मुंबईला या सामन्यात मोठा झटका लागला आहे.
नॅट सायव्हर ब्रँट आऊट
Toss Update 🪙
We are bowling first today. Hayley is in for Nat, who is unwell.
— Mumbai Indians (@mipaltan) January 13, 2026
मुंबईची मॅचविनर ऑलराउंडर नॅट सायव्हर ब्रँट हीला गुजरात विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. नॅटला बरं वाटत नसल्याने या सामन्यात खेळता येणार नाहीय. त्यामुळे नॅटच्या जागी हेली मॅथ्यूज हीचा समावेश करण्यात आल्याची माहिती कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टॉसनंतर दिली.
नॅटने दिल्ली विरूद्धच्या शेवटच्या सामन्यात ऑलराउंड कामगिरी करुन मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती. नॅटने त्या सामन्यात 70 धावा केल्या. त्यानंतर नॅटने 2 विकेट्सही मिळवल्या होत्या. आता नॅटच्या अनुपस्थितीत हेली कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान गुजरातलाही नाईलाजाने 1 बदल करावा लागला आहे. अनुष्का शर्मा हीच्या जागी आयुषी सोनी हीचा समावेश करण्यात आला आहे. आयुषीचं यासह पदार्पण झालं आहे. अनुष्काला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे.
गुजरात जायंट्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : बेथ मुनी (विकेटकीपर), सोफी डिव्हाईन, एश्ले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, भारती फुलमाळी, आयुषी सोनी, कनिका आहुजा, काश्वी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका सिंग ठाकूर.
वूमन्स मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जी कामालीनि (विकेटकीपर), अमेलिया केर, निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनिम इस्माईल आणि त्रिवेणी वसिष्ठा.