पाकिस्तानी आपल्या लायकीवर उतरले, मोहम्मद युसूफने कर्णधार सूर्यकुमारला दिली शिवी

आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. इतकंच काय तर हँडशेक न करता लायकी दाखवून दिली. त्यामुळे पाकिस्तानची संपूर्ण जगात शरमेने मान झुकली आहे. आता पाकिस्तानी आपल्या लायकीप्रमाणे वागताना दिसत आहे. एक टीव्ही शो मध्ये मोहम्मद युसूफने कर्णधार सूर्यकुमार यादवला शिवीगाळ केली.

पाकिस्तानी आपल्या लायकीवर उतरले, मोहम्मद युसूफने कर्णधार सूर्यकुमारला दिली शिवी
पाकिस्तानी आपल्या लायकीवर उतरले, मोहम्मद युसूफने नॅशनल टीव्हीवर कर्णधार सूर्यकुमारला दिली शिवी
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 16, 2025 | 5:39 PM

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच आयसीसीने एक धक्का दिला. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तक्रार केराच्या टोपलीत टाकली आहे. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्यास नकार दिला आहे. असं असताना पाकिस्तानी क्रिकेटपटू आपल्या लायकीप्रमाणे वागताना दिसत आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद युसूफने एका टीव्ही कार्यक्रमात पातळी सोडून भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर भाष्य केलं आहे. भारतीय कर्णधार आणि संघाने हँडशेक न केल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर लाज गेली आहे. टॉस आणि सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला दूरच ठेवलं. त्यामुळे मोहम्मद युसूफने सूर्यकुमार यादववर अभद्र शब्दात भाष्य केलं.

मोहम्मद युसूफ आशिया कपच्या एका कार्यक्रमात समा टीव्हीवर एक तज्ज्ञ म्हणून बसला होता. तेव्हा त्याने जाणीवपूर्वक सूर्यकुमार यादवचं नाव चुकीचं घेतलं आणि अभद्र शब्द वापरला. युसूफने समा टीव्हीवर सांगितलं की, भारत आपल्या फिल्मी जगातून बाहेरच निघत नाही. त्यांना शरम वाटली पाहीजे. ज्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. पंचांचा वापर करत आहेत, सामनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाकिस्तानला त्रास देत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.

दुसरीकडे, अँडी पायक्रॉफ्ट पुढच्या सामन्यात सामनाधिकारी असेल तर खेळणार अशी भूमिका पाकिस्तानने घेतली होती. पण पुढच्या सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट असणार हे नक्की झालं आहे. कारण आयसीसीने पीसीबीची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता आपला शब्द पाळणं कठीण होत आहे. 17 सप्टेंबरला युएईविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना पाकिस्तान खेळला नाही तर स्पर्धेतून आऊट होईल. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. इतकंच काय तर बहिष्कार जरी टाकला तरी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. यातून सावरणं देखील पाकिस्तानला क्रिकेट बोर्डला कठीण होईल. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.