AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: पाकिस्तानला जय शाह यांची वाटते भीती, एक चूक आणि डब्यात जाईल पीसीबी

आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान संघावर नामुष्की ओढावली आहे. आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्यानंतर पाकिस्तानची लाज गेली आहे. त्यामुळे आता युएईविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची वेळ आहे. पण तसं करणंही महागात पडू शकतं. त्याला कारण जय शाह आहेत. का ते जाणून घ्या..

Asia Cup 2025: पाकिस्तानला जय शाह यांची वाटते भीती, एक चूक आणि डब्यात जाईल पीसीबी
Asia Cup 2025: पाकिस्तानला जय शाह यांची वाटते भीती, एक चूक आणि डब्यात जाईल पीसीबीImage Credit source: PTI
| Updated on: Sep 16, 2025 | 4:06 PM
Share

आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. युएई विरुद्धचा सामना गमावला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. दुसरीकडे, अँडी पायक्रॉफ्ट यांची तक्रार करून पाकिस्तानला तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. हँडशेक प्रकरणावर आयसीसीआयकडे तक्रार केली. यात पायक्रॉफ्टने दोन्ही संघांना हँडशेक करण्यास मनाई केल्याची ठपका ठेवण्यात आला होता. पण आयसीसीने या तक्रारीला भीक घातली नाही. उलट अँडी पायक्रॉफ्ट यांना क्लिनचीट दिली आहे. त्यात पाकिस्तानी मीडियात या प्रकरणी बरीच चर्चा रंगली होती. जर अँडी पायक्रॉफ्टची हकालपट्टी केली नाही तर पाकिस्तान ते सामनाधिकारी असलेल्या सामन्यात खेळणार नाही. पाकिस्तानचा पुढचा सामना युएईसोबत 17 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट आहेत. त्यामुळे पाकिस्तान या सामन्यावर बहिष्कार टाकेल असं सांगण्यात येत होतं. पण तसं करणं महागात पडू शकते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या संघाला आशिया कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यास सांगणार नाही. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पाकिस्तानचा संघ आशिया कप स्पर्धेत खेळला नाही तर जय शाह यांच्या नेतृत्त्वातील आयसीसी त्यांच्यावर मोठा दंड ठोठावू शकते. पाकिस्तानला हे आर्थिक नुकसान परवडणारं नाही. कारण पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आणि नंतर स्टेडियम दुरूस्त करण्यास खूपच पैसा खर्च केला आहे. त्यामुळे पीसीबीची आर्थिक स्थिती नाजूक आहे.

पाकिस्तान आणि युएई यांच्यातील पुढचा सामना 17 सप्टेंबरला होत आहे. हा सामना पाकिस्तानने जिंकला तर पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत भारत पाकिस्तान लढत होईल. हा सामना 21 सप्टेंबरला होईल. या सामन्यातही भारतीय संघाचा तसाच पवित्रा असणार आहे. दुसरीकडे, भारत पाकिस्तान संघ आयसीसी अकादमीत सराव करत आहेत. पण दोन्ही संघांच्या सरावाची वेळ वेगवेगळी आहे. पण एक तास तरी एकत्र दिसतील. भारताची सरावाची वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 9 आहे. तर पाकिस्तानचा संघ रात्री 8 ते रात्री 11 पर्यंत सराव करणार आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.