हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड? 33 नंबरमुळे रिलेशनशिपचं गुपित झालं उघड
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची आगेकूच सुरु आहे. हार्दिक पांड्या देखील फॉर्मात असल्याचं दिसत आहे. असं असताना मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे.

आशिया कप स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पांड्याकडून फार अपेक्षा आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने चांगलं षटक टाकलं. असं असताना खासगी आयुष्याबाबतही चर्चेत आला आहे. रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या एका मॉडेलच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यावरून अंदाज बांधला जात आहे. या मॉडेलने हातावर 33 नंबर गोंदल्याने चर्चेला जोर मिळत आहे. कारण हार्दिक पांड्याच्या जर्सीचा नंबर देखील 33 आहे. तिच्या सेल्फीत एक व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हार्दिक पांड्या असल्याचा दावा नेटकरी सोशल मीडियावर करत आहे. रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याचं जॅस्मिन वालियासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. तसेच मॉडेल माहिका शर्मासोबत सूत जुळलं आहे. माहिका शर्मा इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. तसेच भारतीय पॅशन जगतातील एक उभरतं नाव आहे.
माहिका शर्मा आहे तरी कोण?
माहिका शर्मा एक मॉडेल आहे सर्वांनाच माहिती आहे. पण या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी माहिकाने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये डिग्री घेतली आहे. माहिकाने व्हिडीओ साँग आणि मोठ्या जाहीरातीत काम केलं आहे. फॅशन जगतात माहिकाने मोठ्या फॅशन डिझायनरसोबत काम केलं आहे. यात मनिष मल्होत्रा, अनिता डोंगरे आणि तरण तहिलियानी या सारखी नावं आहेत. माहिकाला 2024 मध्ये इंडियन फॅशन अवॉर्डमध्ये मॉडेल ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला होता.
View this post on Instagram
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविक यांनी संमतीने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिक पांड्याचं नाव ब्रिटीश सिंगर जॅस्मिन वालियाशी जोडलं गेलं. इतकंच काय जॅस्मिन सामने पाहण्यासाठी मैदानात हजर असायची. त्यामुळे या दोघांमध्ये काही सुरु असल्याची चर्चा होती. आता या दोघांमध्ये ब्रेकअपची चर्चा आहे. तसेच सोशल मीडियावर माहिका आणि हार्दिक पांड्या यांचं नाव जोडलं जात आहे. माहिकाचा स्वभाव हार्दिक सारखाच आहे. कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास ढळू देत नाही. एका फॅशन इव्हेंटमध्ये तिच्या डोळ्यांना एलर्जी झाली होती. असं असूनही तिने आत्मविश्वासाने रॅमवॉक केला होता. इतकंच गौरव गुप्ताच्या एका कार्यक्रमात रँपवर चालताना टाच तुटली होती. पण न घाबरता ती रँपवर चालत राहिली.
