पाकिस्तानच्या फलंदाजाची बोलती बंद करणारा खेळाडू, एका चेंडूत केला चमत्कार, पाहा व्हिडीओ

भारतीय खेळाडू इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटकडे वळले आहेत. उमेश यादवने या हंगामात काउंटी क्रिकेटमध्येही चमक दाखवली आहे. त्याच्याशिवाय चेतेश्वर पुजारानेही कौंटी खेळून कसोटी संघात पुनरागमन केले. अधिक वाचा....

पाकिस्तानच्या फलंदाजाची बोलती बंद करणारा खेळाडू, एका चेंडूत केला चमत्कार, पाहा व्हिडीओ
मोहम्मद सिराज
Image Credit source: social
| Updated on: Sep 12, 2022 | 8:13 PM

नवी दिल्ली : भारताचे (India) अनेक क्रिकेटर्स सध्या कौंटी क्रिकेटमध्ये खळत आहेत. यात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) देखील आहे. यानं एक असा चेंडू फेकला आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानं नेमकं असं काय केलंय. त्याची चर्चा का रंगली आहे. याविषयी आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. अनेक भारतीय क्रिकेटपटू कुठे आहेत, असं तुम्हाल विचाराल तर ते कौंटी क्रिकेट (Cricket) खेळत आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपला मोहम्मद सिराज . सिराज यानं इंग्लंडच्या वॉरविकशायर काउंटीकडून खेळायला सुरुवात केली आणि तो चर्चेतच आला. हा संघ काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सॉमरसेटविरुद्ध खेळत आहे. आजपासून सामना सुरू झाला असून सिराजने पहिल्याच दिवशी मोठी विकेट घेत दहशत निर्माण केली आहे. या सामन्यात सिराजनं पाकिस्तानचा फलंदाज इमाम-उल-हकला बाद केलंय. इमाम सॉमरसेटसाठी डावाची सलामी देण्यासाठी मैदानात उतरला.

नेमकं काय झालं?

सिराज डावातील 10 वे षटक टाकत होता. पाकिस्तानचा खेळाडू इमामसाठी ओव्हर द विकेट टाकणाऱ्या सिराजने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला. चेंडू लहान असला तरी इमामने मोहात पडून शॉट खेळला. चेंडू त्याच्या बॅटला नीट लागला नाही आणि बॅटची आतील कड घेऊन तो स्टंपवर गेला. इमामने या सामन्यात केवळ पाच धावा केल्या. त्याने 20 चेंडूंचा सामना केला.

हा व्हिडीओ पाहा….

सिराज विषयी हेही वाचा…

  1. सिराजला आशिया चषकात स्थान मिळू शकलेलं नाही.  यापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याची संघात निवड झाली होती. त्यापैकी दोन सामने जिंकण्यात तो यशस्वी ठरला होता. त्यानं दोन्ही सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतली.
  2. सिरजची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात निवड झाली होती. तो तीन एकदिवसीय सामने खेळला. पण फक्त चार विकेट घेऊ शकला. ॉ
  3. सिराज मर्यादित षटकांमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग नसला तरी कसोटीत तो सातत्याने संघासोबत राहिला आहे. सिराजने याच भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करत संघासाठी चांगली कामगिरी केली.

अनेक खेळाडू काउंटीमध्ये

केवळ सिराजच हाच नाही तर टीम इंडियातून बाहेर असलेले अनेक भारतीय खेळाडू इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटकडे वळले आहेत. उमेश यादवने या हंगामात काउंटी क्रिकेटमध्येही चमक दाखवली आहे. त्याच्याशिवाय चेतेश्वर पुजारानेही कौंटी खेळून कसोटी संघात पुनरागमन केले. वॉशिंग्टन सुंदरही कौंटी खेळायला गेला होता पण तो जखमी झाला होता.