मोहसिन नकवीने सोपवली आशिया कप 2025 ट्रॉफी, झालं असं की…

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने 5 गडी राखून पराभवाची धूळ चारली. पण पाकिस्तानच्या मोहसिन नकवी यांच्या हातून भारताने ट्रॉफी घेण्यास नकार दिला. पण नकवी ही ट्रॉफी चोरून पळून गेले. पण आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

मोहसिन नकवीने सोपवली आशिया कप 2025 ट्रॉफी, झालं असं की...
मोहसिन नकवीने सोपवली आशिया कप 2025 ट्रॉफी सोपवली, झालं असं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 01, 2025 | 4:55 PM

आशिया कप स्पर्धेत भारताने एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं. इतकंच काय तर पाकिस्तानला तीनदा पराभूत केलं. अंतिम फेरीत पाकिस्तान जिंकेल असं वाटत होतं. पण तिलक वर्माने विजयाचा घास त्यांच्या घशातून खेचून आणला. पाकिस्तानला 5 गडी राखून धोबीपछाड दिला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. हँडशेक न करता त्यांची लायकी दाखवली. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशासोबत कसं वागवं हे दाखवून दिलं. इतकंच काय तर पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. पण मोहसिन नकवी हे भिकारी पाकिस्तानचे मंत्री.. त्यांना कसली लाज लज्जा.. ते देखील भिकारी असल्याचं दर्शन घडवलं. भारताने जिंकलेली ट्रॉफी घेऊन पळून गेले. भारतीय संघ मैदानात त्या ट्रॉफीची वाट पाहात होते. दुसऱ्या कोणाच्या हातून घेण्याची तयारी होती.पण मोहसिन नकवी या ट्रॉफीसह पळून गेल्याने भारतीय संघ मायदेशी तसाच परतला. तसेच ट्रॉफीशिवाय सेलीब्रेशन केलं.

दुबईत झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयने हा मुद्दा उचलला आणि मोहसिन नकवी यांच्यावर टीकेचे बाण सोडले. आशियाई क्रिकेट परिषद आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी ट्रॉफी दिल्याचं वृत्त समोर येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, यापूर्वी मोहसिन नकवीने काही अटी ठेवल्याची माहिती होती. पण आता युएई क्रिकेट बोर्डाकडे ट्रॉफी सुपूर्द केली आहे. त्याने आता युएई क्रिकेट बोर्ड ही ट्रॉफी बीसीसीआयला देणार असल्याचं कळत आहे. जर असं झालं असेल तर पुन्हा एकदा पाकिस्तानला नाक घासावं लागल्याचं दिसत आहे.

बीसीसीआयने एसीसी बैठकीत स्पष्ट केलं की, भारताने आशिया कप 2025 चं जेतेपद मिळवलं आहे. त्या ट्रॉफीवर भारताचा हक्क आहे. टीम इंडियाने या सामन्यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की ते मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. भारताची कोणत्याही अधिकाऱ्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी होती. तरी नकवी यांनी हट्टपणा सोडला नाही. तसेच आपल्याच हातून ट्रॉफी देण्यावर ठाम राहीले. इतकंच काय तर टीम इंडियाची पदके आणि ट्रॉफी हॉटेलमध्ये घेऊन गेले.