AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपक चहरच्या ‘त्या’ खेळीनंतर धोनीचा खास मेसेज, दीपकने स्वत:च सांगितला किस्सा, माही म्हणाला…

दीपकने श्रीलंका दौऱ्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेली अर्धशतकी खेळी भारतासाठी फार महत्त्वाची ठरली. भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात करत तो सामना खिशात घातला होता.

दीपक चहरच्या 'त्या' खेळीनंतर धोनीचा खास मेसेज, दीपकने स्वत:च सांगितला किस्सा, माही म्हणाला...
दीपक चहर
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 5:04 PM
Share

मुंबई: वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघातील युवा खेळाडू दीपक चहरला (Deepak Chahar) ओळखलं जात. पण श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपकने बोलिंगसह बॅटिंगमध्येही धमाकेदार प्रदर्शन दाखवत  सामन्यात उल्लेखणीय कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने श्रीलंकेच्या तोंडातील विजय खेचून आणत भारताला मिळवून दिला. दीपकने केलेल्या नाबाद 69 धावांच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असताना त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) देखील एक मेसेज केला होता. दीपकने स्वत: चेन्नई सुपरकिंग्सच्या (Chennai Super Kings) वेबसाइटशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला.

यावेळी दीपक म्हणाला, ‘इतक्या दिवसानंतर मला एका योग्य ठिकाणी फलंदाजी करायची संधी मिळाली होती. तिचा संपूर्ण फायदा मला उचलायचा होता आणि मी तसचं केलं. जेव्हा सामन्यात माझी फलंदाजी आली तेव्हा संघ फार खराब परिस्थितीत होता अशावेळी मी सामना जिंकण्याचा विचार करत नव्हतो. तर मला संपूर्ण ओव्हर्स खेळायचे होते. पण जसजसा सामना विजयाजवळ जाऊ लागला वेगळचं काही वाटतं होतं. आधी मी डिफेन्सीव खेळ खेळत होतो. पण जसजसा सामना संपत आला आणि चेंडू कमी आणि धावा अधिक राहू लागल्या तेव्हा मी मोठे शॉट खेळू लागलो.’

धोनी म्हणाला Well Played

29 वर्षीय दीपकला या अप्रतिम विजयानंतर धोनीचा मेसेज आला. यामध्ये धोनीने त्याच्या फलंदाजीचं कौतुक करत केलं होतं. या मेसेजबद्दल दीपक म्हणाला, ‘एमएस धोनीने मला मेसेज केला. ज्यात त्याने चांगला खेळलास! (Well Played) असं लिहिलं होतं. माझ्यासाठी ही एक खूप मोठी गोष्ट होती. मी चेन्नई संघातून खेळत असताना धोनीने कायम एक फलंदाज म्हणूनही माझ्यावर विश्वास ठेवला आहे.’

टी-20 विश्वचषकाचं तिकीट

दीपक चहरला आयपीएलसह श्रीलंका दौऱ्यातील अप्रतिम कामगिरीचं फळ मिळालं आहे. आगामी टी-20 विश्वचषकसाठी (T20 World Cup) त्याला मुख्य संघात स्थान नसलं मि्ळालं तरी राखीव तीन खेळाडूंमध्ये त्याच नाव आहे. त्याआधी आता आय़पीएलच्या उर्वरीत सामन्यातही चहरचा जलवा पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – 

दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

(MS Dhoni messaged deepak chahar well played after win in India vs Sri lanka second one day match)

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.