
न्यूझीलंडला रविवारी 8 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडला या पराभवासह आयसीसी टी 20i वर्ल्ड कप गमवावा लागला. मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात न्यूझीलंड उपविजेता ठरली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित या महाअंतिम सामन्यात यजमान आणि गतविजेत्या भारतीय संघाने न्यूझीलंडवर 96 धावंनी मात करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये ऑलआऊट 156 रन्सपर्यंतच पोहचता आलं. भारताने या विजयासह असंख्य विक्रम आपल्या नावावर केले.
इंडिया एकूण 3 टी 20i वर्ल्ड कप जिकंणारी पहिली टीम ठरली. तसेच इंडिया सलग 2 आणि मायदेशात वर्ल्ड कप ट्रॉफी राखण्यात यशस्वी ठरणारी पहिली टीम ठरली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात ही कामगिरी केली. भारताचं या ऐतिहासिक विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भारताचं अभिनंदन केलं. धोनीने या पोस्टमध्ये गंभीर तु हसताना चांगला दिसतोस असं म्हटलं. मात्र धोनीने टीम इंडियाच्या एका खेळाडूचं नाव न लिहिलेलंच बरं, असं म्हणत त्याचं नाव घेतलं. याची चर्चा रंगली आहे.
धोनीने टीम इंडियासाठी अभिनंदनाची पोस्ट केली. धोनीने या पोस्टच्या शेवटी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा उल्लेख केला.”बुमराहबाबत काही लिहिलं नाही तरच चांगलं आहे”, असं धोनीने म्हटलं. धोनीने याला जोडून बुमराहाचा “चॅम्पियन बॉलर” असा उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे. धोनीच्या या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
धोनीची इन्स्टा पोस्ट
दरम्यान जसप्रीत बुमराह या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहने 8 सामन्यांमधील 8 डावांत एकूण 28 ओव्हरमध्ये 12.43 च्या सरासरीने 168 धावा देत एकूण आणि सर्वाधिक 14 विकेट्स मिळवल्या. बुमराहने 14 पैकी 4 विकेट्स या न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात घेतल्या. बुमराहची अशाप्रकारे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 4 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली.