Smriti Mandhana : धोनीने मला WhatsApp मेसेज केलेला अ्न…; कॅप्टन्सी मिळताच स्मृती मानधनाकडून सीक्रेट उघड

Smriti Mandhana On MS Dhoni : भारताच्या महिला संघाने 2 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत वर्ल्डकर जिंकला होता. त्यावेळी जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्याचवेळी माहीनेही एक मेसेज करत संघाचं अभिनंदन केलं होतं, याबद्दलचाच एक किस्सा स्मृतीने सांगितला आहे.

Smriti Mandhana : धोनीने मला WhatsApp मेसेज केलेला अ्न...; कॅप्टन्सी मिळताच स्मृती मानधनाकडून सीक्रेट उघड
Ms Dhoni Congratulate Team India For Wining World Cup Against SA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 4:21 PM

भारताच्या क्रिकेट जगतात अनेक बदल होत आहेत. महिला असो वा पुरुष दोन्ही संघांनी अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. जग जिंकलं आहे. भारतीय क्रिकेटचं भविष्य प्रचंड उज्वल आहे, असं म्हणणं अजिबात अयोग्य ठरणार नाही. अलिकडेच महिला क्रिकेट संघात मोठ्या घडामोडी घडल्या. भारतीय महिला संघासाठी कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणारी कर्णधार हरमनप्रीतने कर्णधारपदावरुन काढता पाय घेतला. याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. पण त्यानंतर तिच्या जागेवर संघाची उत्कृष्ट फलंदाज आणि स्टार खेळाडू स्मृती मानधना हिची निवड करण्यात आली. टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती भारतीय महिला संघासाठी आता कर्णधार म्हणून काम करणार आहे. तर हरमनप्रीत ही केवळ कसोटीसंघाची कर्णधार असणार आहे.

दरम्यान, हरमनच्या नेतृत्वामध्ये भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकला होता. हा वर्ल्डकप जिंकल्यानंतर आपल्याला एम.एस. धोनीने थेट मेसेज केला होता आणि आपलं अभिनंदन केलं होतं, अशी माहिती स्मृती मानधनाने एका मुलाखतीमध्ये दिली आहे. या मुलाखतीला स्वतः धोनीही उपस्थित होता.

Loading...

भारतीय संघाने जेव्हा वर्ल्डकप जिंकला तेंव्हा सबंध देशाने जल्लोष साजरा केला. त्याचवेळी जगभरातून भारतीय चाहत्यांकडून महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात होता. अनेक दिग्गज खेळाडूंनीही संघाला शुभेच्छा दिल्या. यामध्ये भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचाही समावेश होता.

स्मृतीने सांगितले की, वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीने आपल्याला व्हाट्स अॅपला मेसेज केला होता. या मेसेजमध्ये धोनीने संपूर्ण टीमला या मोठ्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि अभिनंदन केलं होतं. स्मृतीने सांगितलं की, धोनीने व्हाट्स अॅपवरुन आपलं आणि संपूर्ण टीमचं कौतुक करत शुभेच्छा दिल्याने प्रचंड आनंद झाल्याचं स्मृतीने यावेळी सांगितलं.

दरम्यान, धोनीनेही यावेळी स्पष्ट केलं की, भारतीय संघाच्या इतर महिला खेळाडूपैकी कोणाचाही मोबाईल नंबर आपल्याकडे नव्हता, त्यामुळे स्मृतीला आपण मेसेज केला आणि सांगितलं की या शुभेच्छा सर्वांपर्यंत पोहचवं. दरम्यान, जग जिंकलेल्या भारतीय क्रिकेटच्या महिला संघालाही माहीच्या शुभेच्छा मिळाल्याने आनंद द्विगुणित झालेला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us