IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला नजर? विकेट मिळाली पण…! आतापर्यंत केल्या 9 चुका

आयपीएल 2026 स्पर्धेत जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला नजर लागल्याचं चर्चा रंगली आहे. त्याला कारणंही तसंचआहे. आयपीएल 2026 स्पर्धेतील आकडेवारीच तसं सांगत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध तसंच काहीसं घडलं. त्यामुळे हातातली विकेट गेली.

IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला नजर? विकेट मिळाली पण...! आतापर्यंत केल्या 9 चुका
IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला नजर? विकेट मिळाली पण...! आतापर्यंत केल्या 9 चुका
Image Credit source: PTI
| Updated on: May 04, 2026 | 10:04 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यातही जसप्रीत बुमराहची जादू काही चालली नाही. जसप्रीत बुमराह विकेटसाठी कासावीस झालेला दिसला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला ही संधी चालून होती. पण नो बॉलमुळे पुन्हा हिरमोड झाला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने विकेट घेतली आणि आनंद साजरा केला. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण सायरन वाजला आणि विकेटऐवजी फ्री हीट मिळाला. फ्री हीटच्या चेंडूवर विकेट जाण्याचं टेन्शन नसतं, पण त्याने चांगला चेंडू टाकला आणि झेल उडाला. हा झेल पकडूनही फार उपयोग नव्हता. पण दुर्दैव असं की हा चेंडूही नो बॉल होता. जसप्रीत बुमराहने टाकलेला नो बॉल पाहून समालोचन करणारे सुनील गावस्करही संतापले.

सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना सांगितलं की, एखादा खेळाडू अशी चूक वारंवार कशी करू शकतो. जसप्रीत बुमराहाने या पर्वात आतापर्यंत 9 नो बॉल टाकले आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराहला नो बॉल टाकण्याची सवय लागल्याचं दिसत आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 10 सामन्यात फक्त 3 विकेट काढल्या आहे. इतकंच काय तर त्याची गोलंदाजी सरासरी 100पेक्षा जास्त आहे. होमग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर बुमराहने सुरूवातीच्या सहा सामन्यात फक्त एकच विकेट घेतली होती. यावेळी सरासरीही 200 पेक्षा जास्त आहे. या पर्वात बुमराहने 9 धावा प्रति षटक इकोनॉमीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराह खूपच वाईट फॉर्मात असल्याचं दिसत आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने चार षटकं टाकली. या चार षटकात त्याने 11.20 इकोनॉमी रेटने 45 धावा दिल्या. यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. इतक काय तर 3 नो बॉल आणि 3 वाइड चेंडू टाकले. जसप्रीत बुमराहने पहिल्या दोन षटकात 31 धावा दिल्या होत्या. जसप्रीत बुमराहचा वाईट फॉर्म पाहता त्याचा योग्य वापर मुंबईच्या कर्णधारांना करणं कठीण झालं आहे.

Follow Us