AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: ‘ही’ आहे Mumbai Indians ची सपोर्टिंग स्टाफची लिस्ट, 18 दिग्गज, मग पराभवासाठी एकटा रोहित कसा जबाबदार?

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये एकूण 18 सदस्य आहेत. यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर, श्रीलंकेचा लीजेंड माहेला जयवर्धने सारखे खेळाडू आहेत.

IPL 2022: 'ही' आहे  Mumbai Indians ची सपोर्टिंग स्टाफची लिस्ट, 18 दिग्गज,  मग पराभवासाठी एकटा रोहित कसा जबाबदार?
रोहित शर्माImage Credit source: IPL
| Updated on: Apr 26, 2022 | 4:03 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खूप खराब स्थिती आहे. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने सलग आठ सामने गमावले आहेत. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील मुंबई इंडियन्सचं हे सर्वात खराब प्रदर्शन आहे. प्लेऑफमध्ये (Play off) दाखल होण्याचं मुंबईच स्वप्न केव्हाच संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सचा संघ बॅड पॅच मधून जातोय. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) प्रत्येकाच्या रडारवर आहे. कारण तो स्वत: सुद्धा खराब फॉर्ममध्ये आहे. धावांसाठी त्याचा संघर्ष सुरु आहे. याच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. अशा स्थितीत एका चॅम्पियन संघाचा सलग आठ सामन्यात पराभव होणं, धक्कादायक आहे. रोहित शर्मावर खराब कॅप्टनशिप, खराब फलंदाजीचा आरोप होतोय. मुंबई इंडियन्सच्या एकूण संघ रचनेवर नजर टाकली, तर लीडरशिप ग्रुपमध्ये एकटा रोहित शर्मा नाहीय. सपोर्ट स्टाफमध्ये दिग्गजांची फौज आहे.

अशा स्थितीत पराभवासाठी एकट्या रोहितला जबाबदार धरणं, कितपत योग्य आहे. मुंबई इंडियन्सच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये एकूण 18 सदस्य आहेत. यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर, श्रीलंकेचा लीजेंड माहेला जयवर्धने सारखे खेळाडू आहेत.

टीममध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी बऱ्यापैकी सपोर्ट टीम आहे. अनेकदा एकाच ठिकाणी अनेक दिग्गज एकत्र जमले, तर काही गोष्टी बिघडतात. इथे सुद्धा असच होताना दिसतय.

असा आहे मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ

सचिन तेंडुलकर – आयकॉन

माहेला जयवर्धने – हेड कोच

झहीर खान – डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स

शेन बॉन्ड – बॉलिंग कोच

रॉबिन सिंह – बॅटिंग कोच

जेम्स पॅमेंट – फिल्डिंग कोच

पॉल चॅपमॅन – स्ट्रेंथ अँड कडिशनिंग कोच

क्रेग गॉवेंडर – हेड थेरेपिस्ट

सीकेएम धनंजय – डाटा परफॉर्मन्स मॅनेजर

राहुल सांघवी – टीम मॅनेजर

अमित शाह – स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट

एल. वरुण – व्हिडिओ एनलिस्ट

आशुतोष निमसे – असिस्टेंट थेरपिस्ट

प्रतीक कदम – असिस्टेंट स्ट्रेंथ अँड कडिशनिंग कोच

नागेंद्र प्रसाद – असिस्टेंट स्ट्रेंथ अँड कडिशनिंग कोच

विजया कुशवाह – असिस्टेंट स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट

मयूर सत्पुते – असिस्टेंट स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट

किनिता कदाकिया पटेल – न्यूट्रिनिस्ट

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार