MI vs PBKS Live Streaming : मुंबई पंजाब विरुद्ध भिडणार, पलटणच्या सामन्याची वेळ बदलली? जाणून घ्या
Mumbai Indians vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : मुंबई इंडियन्ससमोर 19 व्या मोसमात गुरुवारी 16 एप्रिलला पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. मुंबई लोकलसमोर पंजाब मेल रोखण्याचं आव्हान असणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 24 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात गेल्या हंगामातील उपविजेता पंजाब किंग्स विरुद्ध भिडणार आहे. पंजाब किंग्सचाही हा पाचवाच सामना असणार आहे. पंजाब किंग्स या मोसमात आतापर्यंत अजिंक्य आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेलेल्या 4 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाबचा केकेआर विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 4 सामन्यांनंतर 7 गुण आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईला विजयी सुरुवातीनंतर सलग 3 पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्सचं कडवं आव्हान असणार आहे. मुंबईकर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना गुरुवारी 16 एप्रिलला होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मायनगरीतील (मुंबई) वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच सामन्यातील प्रत्येक अपडेट ही https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/series/ipl या लिंकद्वारे जाणून घेता येईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
हिटमॅन रोहित शर्मा घरच्या सामन्यातून आऊट!
दरम्यान पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्याआधी मुंबईला मोठा झटका लागला आहे. मुंबईचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज तसेच लोकल बॉय रोहित शर्मा याला दुखापतीमुळे पंजाब विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागणार आहे. रोहित पंजाब विरुद्ध खेळणार की नाही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र रोहितच्या दुखापतीचा अंदाज घेता त्याला खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.