पहलगाम दहशतवादी हल्ला माझ्याच देशाने केला, पाकिस्तानी क्रिकेटपटूने सर्व बनाव केला उघड

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू आपल्या देशाचा सत्य सर्व जगासमोर वारंवार आणत आहे. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिलं आहे. पाकिस्तानचा उपपंतप्रधानांच्या प्रतिक्रियेला संबोधून त्याने हे वक्तव्य केलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला माझ्याच देशाने केला, पाकिस्तानी क्रिकेटपटूने सर्व बनाव केला उघड
दानिश कनेरिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 25, 2025 | 3:36 PM

पहलगाम हल्ल्यानंतर कुरापती करणाऱ्या पाकिस्तानच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. भारताने यावेळेस मुसक्या आवळण्याची पूर्ण तयारी केली आहे. एक एक करत पाकिस्तानची कोंडी सुरु केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात आता खळबळ उडाली आहे. असं असताना पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने केला आहे. पाकिस्तानचा हिंदू क्रिकेटपटू दानिशने असा दावा करण्याचं कारण काय? यावेळी त्याने पाकिस्तानच्या उपपंतप्रधानाने केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पाकिस्तानचा उपपंतप्रधानाने पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख ‘स्वातंत्र्य सेनानी’ असा केला होता. उपपंतप्रधानाने केलेल्या वक्तव्यानंतर दानिश कनेरिया संतापला आहे. त्याने एक्स हँडलवर लिहिताना स्पष्ट केलं की, उपपंतप्रधानाने दहशतवाद्यांचा उल्लेख स्वातंत्र्य सेनानी करणं हे अपमानकारक नाही. तर हल्ला आमच्या देशाने केल्याचं मान्य करणं होय.

दानिश कनेरिया पाकिस्तानचा एकमेव हिंदू क्रिकेटपटू होता. आता आपल्या देशाची पोलखोल करण्याची मोहीम उघडली आहे. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने सरकार आणि त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याने आपल्या एक्स हँडलवर लिहिलं की, जर खरंच पाकिस्तानचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभाग नाही तर पंतप्रधान शहबाज शरीफने त्याबाबत चिंता का व्यक्त केली नाही? अचानक सेन्यदलाला का अलर्टवर राहण्यास सांगितलं? स्पष्ट आहे की तुम्हाला खरं माहिती आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि त्याला प्रोत्साहान देत आहात. असं करताना शरम वाटली पाहीजे.

दानिश कनेरिया वारंवार पाकिस्तानची पोलखोल करत आहे. एक्स मीडियावर कोणाचीही तमा न बाळगता व्यक्त होत आहे. दरम्यान गुरुवारी केलेल्या पोस्टमध्ये त्याने सांगितलं होतं की, मी पाकिस्तानच्या जनतेविरुद्ध बोलत नाही. खरं तर पाकिस्तानच्या सामान्य जनतेने दहशतवाद्यांकडून सर्वाधिक दु:ख झेललं आहे. शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. दहशतवाद्यांना आश्रय आणि निष्पाप लोकांच्या हत्येनंतर गप्प बसणारं नेतृत्व नको.