AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्यासोबत पहलगाम सारखं…’ पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून आपल्याच देशाची पोलखोल

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. हिंदू पर्यटकांना टार्गेट करून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याबाबत आपल्याच सरकारची पोलखोल करत आहे.

'माझ्यासोबत पहलगाम सारखं...' पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून आपल्याच देशाची पोलखोल
दानिश कनेरियाImage Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 24, 2025 | 10:27 PM
Share

काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. पर्यटनासाठी आलेल्या हिंदू नागरिकांना लक्ष्य करून गोळ्या झाडल्या. त्यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध राग आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानला लवकरच धडा शिकवू असा इशारा दिला आहे. असं असताना पाकिस्तानातूनही असाच आवाज उचलला जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपल्याच देशाची पोलखोल केली आहे. क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितलं की, हिंदू असल्याने पाकिस्तानात वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने वारंवार या घटनेचा निषेध केला आहे. इतकंच काय तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पाकिस्तानचा या हल्ल्यात कोणताही हस्तक्षेप नव्हता तर याप्रकरणी निषेध का नोंदवला नाही?

दानिश कनेरियाने सोशल मीडियावर एका पाकिस्तान युजर्सचं तोंड बंद करत लिहिलं की, हिंदू असल्या कारणाने असाच निशाणा साधला गेला, जसं की पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू असल्याने मारलं. दानिशने एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, ‘मी पाकिस्तान किंवा लोकांविरुद्ध बोलत नाही. मी पण एकदा अभिमानाने पाकिस्तानची जर्सी परिधान केली होती. मी सुद्धा क्रिकेटच्या मैदानात घाम गाळला आहे. पण माझा शेवटही पहलगाम हल्ल्यातील पीडितांसारखाच झाला. फक्त हिंदू असल्याने टार्गेट केलं गेलं.’

22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या नागरिकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केलं. गोळ्या झाडण्यापूर्वी प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला. पीडित नागरिकांनी याचा खुलासा मीडियासमोर केला आहे. हिंदू असल्याचं कळताच निर्घृणपणे बायका मुलांसमोर हत्या केली. या हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला.

पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.