
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 16 व्या सामन्यात डी ग्रुपमधील नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ आमनेसामने आहेत. एडन मारक्रम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर स्कॉट एडवर्ड्स नेदरलँड्सची धुरा सांभाळणार आहे. हा सामना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मारक्रम याने फल्डिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं खास लक्ष असणार आहे. कारण नेदरलँड्सला दक्षिण आफ्रिके विरुद्ध सामना जिंकून हॅट्रिक करण्याची संधी आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आतापर्यंत असोसिएट नॅशन अर्थात प्रमुख संघाच्या तुलनेत नवख्या आणि दुबळ्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यूएसएने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर मात केली. त्यांनतर अफगाणिस्तानने 8 जून रोजी न्यूझीलंडला पराभूत केलं. क्रिकेट चाहत्यांना अशाप्रकारे 2 उलटफेर पाहायला मिळाले. आता नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर हॅटट्रिकही पूर्ण होईल आणि क्रिकेट चाहत्यांना तिसरा उलटफेर पाहायला मिळेल.
नेदरलँड्सने याआधी दक्षिण आफ्रिकेला एडलेडमध्ये 2022 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत केलं होतं. तेव्हा नेदरलँड्सने पराभूत करत दक्षिण आफ्रिकेला सेमी फायनलमध्ये पोहचण्यापासून रोखलं होतं. तर त्यानतंर भारतात 2023 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत धर्मशाला येथे नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता नेदरलँड्सला दक्षिण आफ्रिकेचा पराभूत करत वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. आता दक्षिण आफ्रिके या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवते की नेदरलँड्स हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान टी 20 वर्ल्ड कप 2024 मोहिमेतील नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. याआधी दोन्ही संघानी विजयी सुरुवात केली आहे. नेदरलँड्सने नेपाळवर 4 जून रोजी 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तर दक्षिण आफ्रिकेने 3 जून रोजी श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे आता कोणती टीम विजयी घोडदौड कायम राखणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन: स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकरेन आणि व्हिव्हियन किंगमा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि ओटनील बार्टमन.