
भारतात सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. एकूण 10 संघांमध्ये प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आगामी टी 20 वर्ल्ड कपकडे लागून राहिलं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर आयसीसीने सर्व सहभागी संघांना आपली टीमची घोषणा करण्यासाठी 1 मे ही अखेरची तारीख दिली आहे. टीम इंडियामध्ये वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी मिळणार? अशी चर्चा सुरु असताना दुसऱ्या बाजूला एका संघाने वर्ल्ड कपसाठी आपली टीम जाहीर केली आहे.
न्यूझीलंडने टी 20आय वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने सोशल मीडियावरुन पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. न्यूझीलंडने मुख्य संघात एकूण 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर राखीव म्हणून एका खेळाडूला संधी दिली आहे. न्यूझीलंड कोच गॅरी स्टीड यांच्या मार्गदर्शनात खेळणार आहे. तर केन विलियमसन न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे.
न्यूझीलंडच्या टी 20 वर्ल्ड कप संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. या खेळाडूंना टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. केन विलियमसन याचा हा सहावा टी वर्ल्ड कप असणार आहे. तर टीम साऊथीचा हा सातवा वर्ल्ड कप आहे. तर ट्रेन्ट बोल्टची ही पाचवी स्पर्धा असणार आहे. न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
न्यूझीलंडचे बरेचसे खेळाडू हे सध्या भारतात आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्यापैकी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणाऱ्या तिघांची न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. डेव्हॉन कॉनव्हे, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर आणि रचीन रवींद्र हे न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. हे तिघे सध्या आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहेत. या तिघांना न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी संधी दिली आहे. भारतीय वंशाचा असलेला ऑलराउंर रचीन रवींद्र याने भारतात 2023 साली झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे रचीनकडून या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही तशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
न्यूझीलंडची टी 20 वर्ल्ड कपसाठी घोषणा
Our squad for the @t20worldcup in the West Indies and USA in June 🏏
MORE | https://t.co/a8cLkEjSDH #T20WorldCup pic.twitter.com/OUwHjEdaPn
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 29, 2024
तर न्यूझीलंड टीममध्ये टीम सायफर्ट, टॉम लॅथम आणि विल यंग या तिघांना शानदार कामगिरीनंतरही स्थान देण्यात आलेलं नाही. तसेच कॉलिन मुनरो यालाही संधी मिळाली नाही. तर कायले जेमीन्सन आणि एडम मिल्ने या दोघांना दुखापतीमुळे स्थान मिळालं नाही.
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी न्यूझीलंड टीम : केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, मायकल ब्रेसवेल, ट्रेन्ट बोल्ट, डेव्हॉन कॉन्व्हे, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, मॅट हेनरी, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी आणि बेन सियर्स (राखीव)