T20I World Cup 2026 स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, रोहितच्या मित्राला कर्णधारपद, रवींद्रला संधी

Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड संघाने बरोबर 1 महिन्याआधी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

T20I World Cup 2026 स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, रोहितच्या मित्राला कर्णधारपद, रवींद्रला संधी
Axar Patel and Rohit Sharma
Image Credit source: AFP
| Updated on: Jan 07, 2026 | 11:04 PM

भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) संघ जाहीर करण्याची सध्या लगबग सुरु आहे. संबंधित क्रिकेट बोर्डाकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात येत आहे. बीसीसीआयने सर्वात आधी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आतापर्यंत एक-एक करुन संघ जाहीर केले जात आहेत. आता न्यूझीलंड क्रिकेट संघ (New Zealand Cricket Team) जाहीर करण्यात आला आहे. ब्लॅककॅप्स या एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

रोहित शर्माच्या मित्राला नेतृत्व

क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय न्यूझीलंड संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या मित्राला न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मिचेल सँटनर हा या स्पर्धेत न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. सँटनर आणि रोहित आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळतात. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात फिन एलेन या विस्फोटक सलामीवीर फलंदाजाचं कमबॅक झालं आहे.

वर्ल्ड कपआधी टी 20i मालिकेचा थरार

न्यूझीलंड वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतात टीम इंडिया विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडची वर्ल्ड कपआधी ही शेवटची मालिका असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी ही मालिका म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेची रंगीत तालिम आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडचा संघ

न्यूझीलंडचा पहिला सामना केव्हा?

वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. न्यूझीलंडला डी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. न्यूझीलंडसह डी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि यूएईचा समावेश आहे.

न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं वेळापत्रक

पहिला सामना, 8 फेब्रुवारी, विरुद्ध अफगाणिस्तान

दुसरा सामना, 10 फेब्रुवारी, विरुद्ध यूएई

तिसरा सामना, 14 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका

चौथा सामना 17 फेब्रुवारी, कॅनडा

टी 20I मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिचेल सँटनर(कर्णधार), ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्यूसन, टीम सायफर्ट, फिन एलेन, जॅक डफी, मॅट हेनरी, रचीन रवींद्र, एडम मिल्न, ईश सोढी, जिमी नीशाम, मार्क चॅपमॅन, डेवन कॉनव्हे, डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल