
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सर्वच संघ खेळाडूंची मोर्चेबांधणी करत आहेत. कारण या स्पर्धेसाठी आता फक्त तीन महिन्यांचा अवधी शिल्लक राहीला आहे. या स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडने संघात मोठा बदल केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात 18 ऑक्टोबरपासून तीन टी20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने 14 सदस्य संघाची घोषणा केली आहे. य संघात सात दिग्गज खेळाडूंना स्थान दिलेलं नाही. केन विल्यमसनसह संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज बेन सीअर्स देखील टी20 संघात स्थान मिळवू शकलेला नाही. सीअर्स हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे इंग्लंड मालिकेपूर्वी न्यूझीलंडला हा मोठा धक्का मानला जात आहे.
फिन एलन पायाच्या दुखापतीमुळे मालिकेसाठी उपलब्ध नाही. पायाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या एडम मिल्नेलाही मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. तर विल्यम ओ’रोर्कनेही पाठीच्या समस्येमुळे मालिकेतून माघार घेतली आहे.ग्लेन फिलिप्स देखील कंबरेच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकला आहे. तर प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे मालिकेसाठी उपलब्ध नाही. केन विल्यमसनला संघात स्थान मिळाले नाही. पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.
Our T20 Squad to face England 🫡
Captain Mitchell Santner and Rachin Ravindra come back into the side 🙌
Read more – https://t.co/KZnlbCHiZm#NZvENG pic.twitter.com/0M3tfXeV73
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 12, 2025
न्यूझीलंड टी20 संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, बेव्हॉन जेकब्स, काइल जेमिसन, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन आणि टिम सेफर्ट (यष्टीरक्षक).
इंग्लंडचा टी20 संघ: हॅरी ब्रुक (कर्णधार), झॅक क्रॉली, जेकब बेथेल, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, सॅम करन, रेहान अहमद, टॉम बँटन (यष्टीरक्षक), जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), सोनी बेकर, ल्यूक वूड, आदिल रशीद, ब्रायडन कार्स.