New Zealand vs Australia T20 world cup Final 2021: ऑस्ट्रेलियाने कोरलं विश्वचषकावर नाव, न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय

New Zealand vs Australia T20 world cup: : विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली ज्यानंतर पाकिस्तानला मात देत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता चषकावर नाव कोरण्यासाठी हे दोघे एकमेंकाविरुद्ध भिडत आहेत.

New Zealand vs Australia T20 world cup Final 2021: ऑस्ट्रेलियाने कोरलं विश्वचषकावर नाव, न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 4:32 PM

यंदाच्या टी20 विश्वचषकातील आज शेवटचा सामना पार पडला. दुबईच्या आंततराष्ट्रीय मैदानावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सनी विजय मिळवत पहिल्यांदाच टी20 चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाने सुरुवात चांगली केली. पण न्यूझीलंडच्या केनने ठोकलेल्या 85 धावांमुळे ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. जे वॉर्नर आणि मार्शच्या अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाने सहज पार करत सामन्यासह स्पर्धांही जिंकली.

टी20 विश्वचषकातील सामन्यांचा स्कोर आणि गुणतालिका सविस्तर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.