AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंडचा धक्कादायक निर्णय, क्रिकेट वर्ल्डकपमधून माघार, स्कॉटलंडला संधी

न्यूझीलंडने 2022 चा पुरुष अंडर-19 वर्ल्ड कप (2022 Under-19 World Cup) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्वारंटाइनच्या नियमांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

न्यूझीलंडचा धक्कादायक निर्णय, क्रिकेट वर्ल्डकपमधून माघार, स्कॉटलंडला संधी
New Zealand team
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 12:48 PM
Share

मुंबई : न्यूझीलंडने 2022 चा पुरुष अंडर-19 वर्ल्ड कप (2022 Under-19 World Cup) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्वारंटाइनच्या नियमांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. न्यूझीलंडमध्ये, अल्पवयीन मुलांनाही बाहेरून आल्यावर क्वारंटीन राहणे आवश्यक आहे. यामुळे आता स्कॉटलंडचा या वर्ल्ड कपमध्ये समावेश झाला आहे. या संघाचे युरोप क्वालिफायरमधून विश्वचषक स्पर्धेतील स्थान हुकले होते. 19 वर्षांखालील विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीत खेळवली जाणार असून एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. अँटिगा आणि बार्बुडा, गयाना, सेंट किट्स आणि नेव्हिस, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील 10 मैदानांवर 16 संघांमध्ये सामने खेळवले जातील. (New Zealand withdraw from 2022 Under-19 World Cup due to ‘quarantine restrictions for minors’ on returning home)

चारवेळा चॅम्पियन ठरलेल्या भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी ब गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि नवोदित युगांडासोबत सामील करण्यात आले आहे. गतविजेत्या बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा आणि संयुक्त अरब अमिराती या चार संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे, तर क गटात पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. यजमान वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना ड गटात स्थान मिळाले आहे. स्कॉटलंड हा या गटातील शेवटचा संघ आहे, त्यांनी न्यूझीलंडची जागा घेतली आहे.

विश्वचषक स्पर्धा 23 दिवस चालणार

प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीगसाठी पात्र ठरतील तर उर्वरित संघ प्लेट प्रकारात खेळतील. ही स्पर्धा 23 दिवस चालणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 1 आणि 2 फेब्रुवारीला तर अंतिम फेरी 5 फेब्रुवारीला सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. याआधी 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान 16 सराव सामनेही खेळवले जाणार आहेत. हे सामने सेंट किट्स अँड नेव्हिस आणि गयाना येथे होणार आहेत.

10 संघ थेट पात्र ठरले

या स्पर्धेत 10 संघांनी थेट पात्रता मिळवली आहे. त्याच वेळी, पाच संघ त्यांच्या विभागीय पात्रता स्पर्धा जिंकून येथे पोहोचले आहेत. कॅनडाने यूएस क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि क्वालिफायरमध्ये अमेरिका, अर्जेंटिना आणि बर्म्युडा यांचा पराभव केला. पापुआ न्यू गिनी पूर्व आशिया-पॅसिफिक प्रदेशातून पात्र ठरला आहे. आफ्रिका विभागातील नामिबिया आणि नायजेरियासारख्या संघांना पराभूत करून युगांडाने पात्रता मिळवली. युरोप प्रदेशातून आयर्लंडने प्रवेश केला आहे. आता न्यूझीलंडचा संघ बाहेर असल्याने स्कॉटलंडही याच प्रदेशातून आला आहे. आतापर्यंतचे विजेते

वेस्ट इंडिजने एकदा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. 2016 मध्ये भारताचा पराभव करून त्यांनी हे यश मिळवले होते. ऑस्ट्रेलियाने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तानने दोनदा हे विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेश प्रत्येकी एकदा विजेते ठरले आहेत. भारताने गेल्या तीन मोसमात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पण फक्त एकदाच ट्रॉफी जिंकता आली. 2016 मध्ये वेस्ट इंडिज आणि 2020 मध्ये बांगलादेशने भारताचा पराभव केला होता.

इतर बातम्या

T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? क्रीडा मंत्र्यांची सावध प्रतिक्रिया

(New Zealand withdraw from 2022 Under-19 World Cup due to quarantine restrictions for minors)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.