IPL 2022 : खेळाडूंनी मोडले नियम, नितीश राणाला दंड; जसप्रीत बुमराहला समज

बुधवारी झालेल्या 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 5 गडी राखून पराभव केला. कालच्या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणाला (Nitish Rana) इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात स्तर 1 चं उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

IPL 2022 : खेळाडूंनी मोडले नियम, नितीश राणाला दंड; जसप्रीत बुमराहला समज
जसप्रीत बुमराहला समज Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:12 PM

मुंबई – बुधवारी झालेल्या 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 5 गडी राखून पराभव केला. कालच्या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणाला (Nitish Rana) इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात स्तर 1 चं उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने त्याच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचं मान्य केलं आहे. जसप्रीत बुमराह आणि नितीश राणा यांना अधिकाऱ्यांनी शिक्षा सुनावली.

नितीश राणाला दहा टक्के रकमेचा दंड

नितीश राणाला दहा टक्के रकमेचा दंड सुध्दा आकारण्यात आला आहे. नितीश राणा याने पुण्यात मुंबईविरोधात झालेल्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहिताचं उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याला अधिकाऱ्यांनी फटकारले आहे. याबाबत अधिक माहिती आयपीएलच्या परिपत्रकात देण्यात आली आहे. आयपीएलच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराला दिली समज

काल झालेल्या सामन्यात बुमराह दोषी आढल्यानंतर त्याला कसल्याही प्रकारचा अर्थिक दंड आकारण्यात आलेला नाही. त्याला पत्रकात समज देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह यांने त्याच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचं मान्य केलं आहे.

मॅचमध्ये काय झालं ?

कोलकाता संघाकडून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले आणि संघाने 20 षटकात 4 गडी गमावून 161 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 52 तर टिळक वर्माने नाबाद 38 धावा केल्या. किरॉन पोलार्डने 5 चेंडूत नाबाद 22 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य 16 षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. व्यंकटेश अय्यर 50 धावा करून नाबाद परतला आणि पॅट कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या.

Vasant More | मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, भोंगा प्रकरणानंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय

Pune VIDEO | नारळाच्या झाडावर चढले, उतरताना वाट लागली, 40 फुटांवर अडकून, पुण्यात सुटकेचा थरार

Kirit at ED : जरंडेश्वरचा हक्क शेतकऱ्यांना कधी मिळणार? शेतकऱ्यांना घेऊन सोमय्या ईडी ऑफिसात, कारखाना सोडण्याचं आवाहन

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.