Kirit at ED : जरंडेश्वरचा हक्क शेतकऱ्यांना कधी मिळणार? शेतकऱ्यांना घेऊन सोमय्या ईडी ऑफिसात, कारखाना सोडण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना घेऊन ईडी कार्यालयात आलेले सोमय्या म्हणाले की, अजित पवारांना कोर्टाने उत्तर दिलेले आहे. ते बेनामी होल्डर आहेत, तर त्यांनी बोलायची गरज काय? जप्त केलेली प्रॉपर्टी शेतकरी चालवू इच्छितात. त्यासाठी 27 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. आता ईडीनेही आम्हाला काही हरकत नसल्याचे सांगितले आहे.

Kirit at ED : जरंडेश्वरचा हक्क शेतकऱ्यांना कधी मिळणार? शेतकऱ्यांना घेऊन सोमय्या ईडी ऑफिसात, कारखाना सोडण्याचं आवाहन
किरीट सोमय्या आणि अजित पवार.
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:44 PM

मुंबईः सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या आरोपाचे भूत पुन्हा एकदा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) गुरुवारी बाटलीतून बाहेर काढले आहे. शेतकऱ्यांना जरंडेश्वरचा हक्क कधी मिळणार असे म्हणत सोमय्या थेट शेतकऱ्यांना घेऊनच ईडीच्या ऑफिसात आले. कारखान्यावरील हक्क अजित दादांनी (Ajit Pawar) सोडावा, कारखाना परत देण्यासाठी पवार कुटुंबाने मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जरंडेश्वर साखर कारखान्याची जमीन तब्बल 214 एकर इतकी आहे. केवळ जमीनच नाही तर कारखान्याची टोलेजंग इमारत आहे. शिवाय या कारखान्याच्या मशिनरी, वाहने, गाड्या, संचालकांचे बंगले या मालमत्तेचा लिलाव केवळ 40 कोटी रुपयांना झालाय. हा कारखाना अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनीने विकत घेतलाय. ते कारखान्याचे वरचे बेनामी होल्डर आहेत, असे उत्तर न्यायालयाने दिले आहे म्हणत सोमय्यांनी गुरुवारी ईडी कार्यालयात धडक दिली.

काय म्हणाले सोमय्या?

शेतकऱ्यांना घेऊन ईडी कार्यालयात आलेले सोमय्या म्हणाले की, अजित पवारांना कोर्टाने उत्तर दिलेले आहे. ते बेनामी होल्डर आहेत, तर त्यांनी बोलायची गरज काय? जप्त केलेली प्रॉपर्टी शेतकरी चालवू इच्छितात. त्यासाठी 27 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. आता ईडीनेही आम्हाला काही हरकत नसल्याचे सांगितले आहे. शेतकरी जर तो कारखाना चालवू इच्छितात, तर कोर्ट एनओसी द्यायला तयार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

कधी मिळणार कारखाना?

सोमय्या म्हणाले की, हा आपला प्रयत्न आहे. कारखाना मिळायला महिनाही लागू शकतो. हा अजित पवारांचा कारखाना नाहीय, तर अजित पवार, शरद पवारांनी त्यासाठी मदत करावी. अजित पवारांवर कारवाई हा नंतरचा भाग झाला. अजित दादा म्हणतात कारखान्यावरील हक्क सोडतो. चांगली गोष्ट आहे. त्यांनी हा हक्क सोडून द्यावा. शेतकऱ्यांना कारखाना देऊन टाकावा. मोदी साहेबांनी नवीन कायदा आणायचा नाही, बदल करायचा नाही, तर फक्त कारखाना परत देण्यासाठी पवार कुटुंबियांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.