Kirit Somaiya: INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला?, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा.. दादा…म्हणंत सोमय्या भडकले

Kirit Somaiya: आएनएस विक्रांतसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पैसा जमा करून ही रक्कम हडप केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून खळबळ उडाली आहे. आज किरीट सोमय्या यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला.

Kirit Somaiya: INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला?, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा.. दादा...म्हणंत सोमय्या भडकले
पत्रकारांच्या प्रश्नावर दादा.. दादा...म्हणंत सोमय्या भडकलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:09 PM

मुंबई: आएनएस विक्रांतसाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पैसा जमा करून ही रक्कम हडप केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. त्यावरून खळबळ उडाली आहे. आज किरीट सोमय्या यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला. विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर सोमय्या गडबडले. सोमय्यांनी दादा… दादा… म्हणंत मूळ विषयाला बगल देत भलतेच उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी सोमय्यांना तोच प्रश्न विचारला. यावेळी मात्र सोमय्यांचा पारा चांगलाच चढला. मी पैसा किती जमा केला आणि तो कुठे गेला याचं उत्तर शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनीच दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्याचं उत्तर दिलं आहे. तुम्ही तेच तेच काय विचारता? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी केला. मात्र, सोमय्या यांनी शेवटपर्यंत या पैशाचं काय झालं याची माहिती पत्रकारांना दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी किरीट सोमय्या आज ईडीच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर साखर कारखान्याचे निवडक सदस्यही होते. यावेळी सोमय्यांना विक्रांतच्या निधीचं काय झालं? असा सवाल करण्यात आला. सोमय्यांना दोनदा हा प्रश्न विचारला. त्यावर ते संतप्त झाले. मला विचारलंच नाही, डायरेक्ट एफआयआर दाखल केली. पोलिसांनी अटक करण्यासाठी हे सेक्शन लावलं, तर पोलिसांनी सांगावं 58 कोटी कुठून आले? मी नाही सांगणार. राऊतांनीच हा आकडा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर सांगितलं आहे, असं उत्तर सोमय्यांनी तावातावात दिलं.

राऊतांनी डॉक्युमेंट द्यावेत, मग बोला

आता मला गुन्हेगार केलं आहे. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय कसं करणार. आता उद्धव ठाकरेंनी सांगावं, तू खूप बोलतोय म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं. विक्रांतला आता 10 वर्ष झाले. राऊतांनी आरोप केला म्हणून प्रश्न उपस्थित झाला. आता चर्चा त्यांच्या आरोपाची आहे. आरोप का आला? कारण त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. संजय राऊतांनी ही कंप्लेंट केली. संजय राऊत हे शिवसेना पार्लामेंट्री कमिटीचे सदस्य आहे, संजय राऊतांनी डॉक्युमेंट द्यावे, नंतर बोलावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

एफआयआरची कॉपी हस्यास्पद

एफआयआरची कॉपी मिळाली. इन्चार्ज मला टोप्या लावत होते, एवढं हास्यास्पद काम उद्धव ठाकरेच करु शकतात. एका नागरिकांनी तक्रार केली की, यात 58 कोटीचा व्यवहार झाला, असं मी वर्तमानपत्रात वाचलं. संजय राऊत बोलतात, तर बोलून गेले. नील सोमय्याच्या खात्यात पैसे खात्यात जमा झाले. अमित शहांना पैसे दिले असंही म्हणाले, त्याचं पुढं काय झालं. एक दीड महिना झाला एसआयटी लावली, काय झालं पुढे? राऊत म्हणाले 426 कोटी वाधवानने दिले, काय झालं पुढे? माझी काही हरकत नाही, माझी चौकशी करा, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

जरंडेश्वरबाबत ईडी कार्याला भेट देणार, सोमय्यांचा इशारा; राऊतांकडे मागितले पुराव्याचे कागद

पंतप्रधान मोदी – पवार भेटीवरुन सोमय्यांचा शरद पवारांवर निशाणा, संजय राऊतांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर

BMC: 31 मेपूर्वीच नालेसफाईची कामे पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांच्या मुंबई पालिकेला आदेश; वादळ, अतिवृष्टीबाबतही दिल्या सूचना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.