NZ vs AUS 1st T20i | ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, न्यूझीलंडवर 6 विकेट्सने मात

NZ vs AUS 1st T20I Match Highlights In Marathi | ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा पहिल्या टी 20 सामन्यात धुव्वा उडवला आहे. टीम डेव्हिड आणि कॅप्टन मिचेल मार्श ही जोडी ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

NZ vs AUS 1st T20i | ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, न्यूझीलंडवर 6 विकेट्सने मात
| Updated on: Feb 21, 2024 | 3:33 PM

वेलिंग्टन | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने न्यूझीलंडवर पहिल्या टी 20 सामन्यात चित्तथरारक आणि सनसनाटी विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अखेरच्या बॉलवर पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांची गरज होती. टीम डेव्हिडने चौकार मारुन ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम डेव्हिड आणि कॅप्टन मिचेल मार्श या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं.

टीम डेव्हिडची फटकेबाजी

डेव्हिड आणि मिचेल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद आणि निर्णायक 44 धावांची भागीदारी केली. टीम डेव्हिडने या भागीदारीत सर्वाधिक धावा केल्या. डेव्हिडने न्यूझीलंडच्या तोडांताल विजयाचा घास हिसकावला. टीमने अवघ्या 10 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. तर मिचेलने 44 बॉलमध्ये नॉट आऊट 72 रन्स केल्या. मिचेलच्या या खेळीत 7 सिक्स आणि 2 चौकारांचा समावेश होता. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजाने आपली भूमिका चोखपणे पार पाडली.

ओपनर ट्रेव्हिस हेड याने 24 धावांचं योगदान दिलं. अनुभवी डेव्हिड वॉर्नर याने 32 धावा जोडल्या. ग्लेन मॅक्सवेल याने 25 धावा केल्या. तर जोश इंग्लिसने 20 रन्स केल्या. त्यानंतर डेव्हिड आणि मार्श या दोघांनी अचूक कार्यक्रम करत विजयी सुरुवात करुन दिली. न्यूझीलंडकडून कॅप्टन मिचेल सँटरन याने 2 विकेट्स घेतल्या. तर एडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्यूसन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. युवा रचीन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनव्हे या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 3 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 215 धावांपर्यंत मजल मारली. रचिनने 35 बॉलमध्ये 68 धावा केल्या. तर कॉनव्हे याने 46 बॉलमध्ये 63 धावांचं योगदान दिलं. ओपनर फिन एलेन याने 32 धावा जोडल्या. तर ग्लेन फिलीप्स याने 19* आणि मार्क चॅपमन याने नाबाद 18 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, ॲडम मिल्ने, ईश सोधी, टीम साउथी आणि लॉकी फर्ग्युसन

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.