AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK 1st T20i | बाबरची अर्धशतकी झुंज, पण न्यूझीलंड विजयी, पाकिस्तानवर 46 धावांनी मात

New Zealand vs Pakistan 1st T20I Match Highlights | माजी कर्णधार बाबर आझम याने पहिल्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला विजयी करण्यासाठी जोर लावला. मात्र ते एकट्याला शक्य झालं नाही.

NZ vs PAK 1st T20i | बाबरची अर्धशतकी झुंज, पण न्यूझीलंड विजयी, पाकिस्तानवर 46 धावांनी मात
| Updated on: Jan 12, 2024 | 3:41 PM
Share

ऑकलंड | बाबर आझम याने पाकिस्तानला पहिल्या टी 20 सामन्यात विजयी करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अखेर न्यूझीलंडचाच विजय झाला आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 180 धावाच करता आल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडने पाकिस्तानवर 46 धावांनी मात केली. बाबरसह इतर फलंदाजांनी प्रयत्न केले खरे, मात्र ते विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. न्यूझीलंडने अशाप्रकारे 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

पाकिस्तानकडून बाबर आझम याने अखेरच्या काही क्षणापर्यंत लढत दिली, पण त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. बाबरने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तसेच टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करण्यापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी रोखलं. तर मिडल ऑर्डरमधील काही फलंदाजांनी धावा केल्या मात्र त्या विजयातील अंतरच कमी करण्यात परिणामी ठरल्या.

पाकिस्तानकडून बाबर व्यतिरिक्त सॅम अयुब याने 27 धावा केल्या. तो रन आऊट झाला. उपकर्णधार मोहम्मद रिझवान 25 धावा करुन माघारी परतला. इफ्तिखार अहमदने 24 धावांचं योगदान दिलं. तर फखर झमान याने 15 आणि विकेटकीपर आझम खान याने 10 धावा केल्या. तर आमेर जमाल याने नाबाद 14 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन शाहीन आफ्रीदी आणि हॅरीस रौफ या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.

न्यूझीलंडकडून टीम साऊथी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. एडम मिल्ने आणि बेन सियर्स या दोघांनी पाकिस्तानच्या 2-2 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर इश सोढी याच्या खात्यात 1 विकेट गेली.

न्यूझीलंडची बॅटिंग

दरम्यान पाकिस्तानने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 226 धावा केल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना फोडून काढला. डेव्हॉन कॉन्वहे आणि इश सोढी या दोघांचा अपवाद वगळता इतरांनी धमाकेदार खेळी केली. कॅप्टन केन विलियमसन आणि डॅरेल मिचेल या दोघांनी अनुक्रमे 57 आणि 61 धावा केल्या.

न्यूझीलंड मालिकेत 1-0 ने आघाडीवर

फिन अॅलेन याने 34, ग्लेन फिलिप्स याने 19, मार्क चॅपमॅन याने 26 आणि एडम मिल्नने 10 धावा केल्या. तर टीम साऊथी 6 धावा करुन नाबाद परतला. कॉनव्हे आणि सोढीला भोपळा फोडता आला नाही. पाकिस्तानकडून कॅप्टन शाहिन आफ्रिदी आणि अब्बास आफ्रिदी या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर हरीस रौफने 2 जणांना आऊट केलं.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, इश सोधी आणि बेन सियर्स.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), आमेर जमाल, उसामा मीर, अब्बास आफ्रिदी आणि हरिस रौफ.

जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...