
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सध्या दुसऱ्या फेरीचा थरार सुरु आहे. आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने रविवारी 5 ऑक्टोबरला पाकिस्तानला पराभूत करत आपल्या मोहिमेतील सलग दुसरा विजय मिळवला. त्यानंतर आता सोमवारी 6 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी कोणता संघ पहिला विजय मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. हा सामना कुठे होणार आणि किती वाजता सुरुवात होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना सोमवारी 6 ऑक्टोबरला होणार आहे.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहता येईल.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहेत. न्यूझीलंड सातव्या आणि दक्षिण आफ्रिका आठव्या स्थानी आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात 1 ऑक्टोबरला पराभूत करत विजयी सलामी दिली. तर इंग्लंडने 3 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. अशाप्रकारे दोन्ही संघांची पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे आता सोमवारी दोघांपैकी एका संघाच्या विजयाची प्रतिक्षा संपणार आहे. तर एका संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सलग दुसरा पराभव टाळण्यासाठी दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.