AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, तिसरा सामना कधी कुठे?

New Zealand vs South Africa 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंडची मालिकेत पराभवाने सुरुवात झाली होती. मात्र यजमानांनी कमबॅक करत मालिकेत बरोबरीत साधली. त्यामुळे आता तिसरा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. जाणून घ्या तिसरा सामना कधी आणि कुठे होणार?

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, तिसरा सामना कधी कुठे?
Mitchell Santner and Keshav MaharajImage Credit source: blackcaps x account
| Updated on: Mar 19, 2026 | 3:03 AM
Share

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही क्रिकेट संघ आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय आणि टी 20I मालिका खेळत आहेत. उभयसंघात एकूण 5 टी 20I सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडमध्ये ही मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील 5 पैकी 2 सामने खेळून झाले आहेत. मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही संघांना तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. या निमित्ताने तिसरा टी 20I सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना शुक्रवारी 20 मार्चला होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना इडन पार्क, ऑकलंड इथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.

न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी कुणाकडे?

मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा आहे. तर केशव महाराज दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. सँटनरचा हा कॅप्टन म्हणून या मालिकेतील शेवटचा सामना असणार आहे. न्यूझीलंडच्या निवड समितीने या मालिकेसाठी 2 कर्णधारांची नियु्क्ती केली. त्यानुसार शेवटच्या 2 सामन्यांत नेतृत्वाची जबाबदारी टॉम लॅथम याला देण्यात आली आहे. त्यामुळे मिचेल सँटनर जाता जाता न्यूझीलंडला एकूण आणि सलग दुसरा क्रिकेट सामना जिंकून देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा