
न्यूझीलंड क्रिकेट टीमने ट्राय सीरिजमधील सहाव्या सामन्यात झिंबाब्वेवर 60 धावांनी मात करत सलग चौथा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान झिंबाब्वेचा हा सलग आणि एकूण चौथा पराभव ठरला. यजमान झिंबाब्वेला या मालिकेतील आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याची संधी होती. मात्र झिंबाब्वे विजयापासून 60 धावा दूर राहिली. न्यूझीलंडने झिंबाब्वेला विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र झिंबाब्वेला न्यूझीलंडसमोर 20 ओव्हर टिकताही आलं नाही. न्यूझीलंडने झिंबाब्वेला 18.5 ओव्हरमध्ये 130 धावांवर गुंडाळत विजयी चौकार लगावला.
झिंबाब्वेकडून टोनी मुनयोंगा, डायन मायर्स आणि ताशिंगा मुसेकिवा या तिघांनाच दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं. ओपनर डायन मायर्स याने 18 बॉलमध्ये 22 रन्स केल्या. ताशिंगा मुसेकिवा याने 100 च्या स्ट्राईक रेटने 21 बॉलमध्ये 21 धावा केल्या. तर टॉनी मनुयोंगा याने सर्वाधिक धावा केल्या. टॉनीने 30 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 40 धावा केल्या. कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सिकंदर रझा याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र सिकंदरने निराशा केली. सिकंदरने 9 धावा केल्या. तसेच इतरांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
न्यूझीलंडच्या विजयात ईश सोढी याने बॉलिंगने प्रमुख भूमिका बजावली. ईशने 4 ओव्हरमध्ये 12 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. मॅट हॅनरी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर झॅकरी फॉल्क्स, विलियम ओरुर्के आणि मायकल ब्रेसवेल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
न्यूझीलंडचा विजयी चौकार
A career-best 4-wicket haul from Ish Sodhi (4-12) saw New Zealand claim a 60-run win in the final round-robin match of the Tri-Series.
Scorecard | https://t.co/0hMDEom5eE
Highlights will be available at Three📺
📷 = Zimbabwe Cricket #ZIMvNZ #CricketNation pic.twitter.com/rEgJKl8ixH— BLACKCAPS (@BLACKCAPS) July 24, 2025
त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडसाठी टीम सायफर्ट आणि रचीन रवींद्र या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. सायफर्टने 45 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीने सर्वाधिक 75 रन्स केल्या. तर युवा ऑलराउंडर रचीन रवींद्र याने 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. मायकल ब्रेसवेल याने 26 धावा केल्या. तर टीम रॉबिन्सन याने 10 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडने अशाप्रकारे 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 190 धावा केल्या. तर झिंबाब्वेकडून रिचर्ड नगारावा आणि टिनोटेंडा मापोसा या दोघांनाच विकेट्स मिळवता आल्या. रिचर्डने 4 विकेट मिळवल्या. तर मापोसाने दोघांना बाद केलं.
दरम्यान शनिवारी 26 जुलैला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात हरारे स्पोर्ट्स क्ल्बमध्ये महाअंतिम सामना होणार आहे. त्यामुळे ही ट्राय सीरिज कोणती टीम जिंकते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.