टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का, दुबळ्या ओमानने पाजलं पराभवाचं पाणी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी श्रीलंकेने सराव सामन्यात ए संघाला उतरवण्याचा निर्णय घेतला होता. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या दोन संघांचा समावेश होता. पण ओमानसारख्या दुबळ्या संघाने श्रीलंका ए संघाला पराभवाचं पाणी पाजलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का, दुबळ्या ओमानने पाजलं पराभवाचं पाणी
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का, दुबळ्या ओमानने पाजलं पराभवाचं पाणी
Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 03, 2026 | 7:32 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सहभागी संघ सराव सामने खेळत आहेत. ओमान संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव सामना खेळला. स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे.  या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेने भारतासारखाच डाव टाकला. निवडलेल्या संघाऐवजी ए संघाला सराव सामन्यात उतरवलं. ओमानने श्रीलंका ए विरुद्ध सामना खेळला.  या सामन्यातील निकाल सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. ओमाने सराव सामन्यात श्रीलंका ए विरुद्ध मोठा विजय मिळवला. या विजयानंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ओमानचा 44 वर्षीय फलंदाज श्रीलंकेवर भारी पडला. त्याच्या खेळीमुळे ओमानने श्रीलंकेवर 5 विकेटने विजय मिळवला. एकीकडे इंग्लंडने टी20 मालिकेत पराभवाची धूळ चारली. आता ओमानने धोबीपछाड दिल्याने दुहेरी धक्का बसला आहे.

श्रीलंका ए संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या दोन खेळाडूंचा समावेश होता. तसेच इतर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा काहीच अनुभव नव्हता. पण दुबळ्या ओमानपेक्षा श्रीलंकन संघ कागदावर वरचढ होता. पण प्रत्यक्षात फार काही करू शकला नाही. कोलंबोत खेळलेल्या या सामन्यात श्रीलंका ए संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमवून 145 धावा केल्या. यात वनुजा सहनने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर ओमानसाठी शाह फैसल आणि जय ओडेड्रा याने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

श्रीलंकेने दिलेलं आव्हान तसं पाहिलं तर कठीण होतं. कारण दुबळ्या ओमानला ते आव्हान श्रीलंकेत पेलणं काही सोपं नव्हतं. त्यामुळे श्रीलंका हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. ओमानने हे लक्ष्य 5 गडी गमवून 18 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी तयार असल्याचं ओमानने दाखवून दिलं. आमिर कलीम आणि विनायक शुक्ला यांचा या विजयात हातभार राहिला. कारण पाच खेळाडू तर एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले होते. 44 वर्षीय आमिर कालीमने 47 चेंडूत 80 धावांची वादळी खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. तर विनायक शुक्लाने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us