video | वय फक्त आकडा, आफ्रिकेच्या 44 वर्षाच्या दिग्गज खेळाडूचा कडक कॅच, पाहा व्हिडीओ

| Updated on: Feb 08, 2024 | 5:28 PM

साऊथ आफ्रिका संघाचा माजी खेळाडूी निवृत्त झाला असला तरी मैदान अजुनही गाजवत आहे. वय वर्षे 44 असलेल्या ताहिर याने चपळाईने रनिंग कॅच घेत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. व्हिडीओ व्हायरल होत आहे.

video | वय फक्त आकडा, आफ्रिकेच्या 44 वर्षाच्या दिग्गज खेळाडूचा कडक कॅच, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुंबई : क्रिकेटमध्ये फिल्डिंगमुळे अनेक सामन्यांचे निकाल बदललेले पाहायला मिळाले आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक सामने आहेत जे फिल्डिंगमुळे पालटलेत. युवा खेळाडू मैदानात उत्साही असतात. टीन इंडियामध्येही असे काही खेळाडू आहेत जे त्यांच्या फिल्डिंगसाठी ओळखले जातात. अशातच एका वयस्कर खेळाडूने दर्जेदार फिल्डिंगचा नमूना सादर केला. दक्षिण आफ्रिकेचा हा माजी खेळाडू असून त्याने साऊथ आफ्रिका 20 लीगमध्ये कमाल कॅच पकडला.

बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये इम्रान ताहिर याने पार्ल रॉयल्स संघाविरूद्धच्या सामन्यात दोन विकेट आणि दोन कॅच घेतले. जॉबर्ग सुपर किंग्सकडून कॅप्टन फाफ डू प्लेसिस आणि एल डू प्लॉय यांच्या अर्धशतकी खेळी करत एलिमिनेटर सामना 9 विकेटने जिंकला. या सामन्यामध्ये इम्रान ताहिर याने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:-

पार्ल रॉयल्स संघााची बॅटींग सुरू असताना जोहान्सबर्ग सुपर किंग्जचा गोलंदाज नांद्रे बर्गर याच्या गोलंदाजीने तिसऱ्या बॉलवर डॅन विलासने मोठा फटका खेळला होता. त्यावेळी फिल्डिंग करत असलेल्या इम्रान ताहिर याने धावत येत शानदार झेल घेतला. कोणालाच विश्वास बसत नव्हता, 44 वर्षाच्या ताहिरने इतक्या चपळाईने झेल घेतला आहे.

दरम्यान, या सामन्याक टॉस जिंकत फाफ डू प्लेसिसने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पार्ल रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना जॉबर्ग सुपर किंग्ज संघाने 9 विकेट राखत लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला.

जॉबर्ग सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (C), लेउस डू प्लॉय, रीझा हेंड्रिक्स, सिबोनेलो मखान्या, मोईन अली, डोनोव्हन फरेरा (W), डग ब्रेसवेल, दयान गॅलीम, सॅम कुक, नांद्रे बर्गर, इम्रान ताहिर

पारल रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, जोस बटलर (डब्ल्यू), मिचेल व्हॅन बुरेन, डेव्हिड मिलर (C), डेन विलास, विहान लुब्बे, अँडिले फेहलुक्वायो, ब्योर्न फॉर्च्युइन, कोडी युसूफ, ओबेद मॅककॉय, तबरेझ शम्सी